शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१२ गणेश मंडळांना प्रथम पुरस्कार

By admin | Updated: September 24, 2016 02:38 IST

लोकमान्य गणेशोत्सव अभियानात सहभागी ६0 मंडळांपैकी तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या १२ मंडळांची नावे जाहीर करण्यात आली.

नाना हिवराळे खामगाव(जि. बुलडाणा), दि. २३- गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आलेल्या लोकमान्य गणेशोत्सव अभियानातील सहभागी ६0 मंडळांपैकी जिल्ह्यातील तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या १२ मंडळांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नांदुरा तालुक्यातून प्रस्तावच नसल्याने या तालुक्यातील क्रमांक किंवा बक्षीस जाहीर करण्यात आलेले नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ह्यस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारचह्ण या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त शासनाच्यावतीने लोकमान्य उत्सव व लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या दहा दिवसांच्या कालावधीत गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविल्या गेले. गणेश मंडळाच्या माध्यमातून स्वदेशी, बेटी बचाव, साक्षरता, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडित देखावा सादर करणार्‍या मंडळाची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. या अभियानात सहभागी संबंधित मंडळांचा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. जिल्ह्यात ६५0 च्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली होती, यापैकी ६0 गणेश मंडळाचे प्रस्ताव गणराया पुरस्कारासाठी प्राप्त झाले होते. गणराया पुरस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने दोन वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र तरीही गणेश मंडळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून ६0 गणेश मंडळाचे प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे प्राप्त झाले होते. प्रस्ताव प्राप्त गणेश मंडळाला तालुकास्तरीय समितीने भेटी दिल्या. शासनाने ठरवून दिलेले देखावे संबंधित गणेश मंडळाने सादर केल्याची पाहणी केली व यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस तालुका स्तरावर संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांनी जाहीर केले.उत्कृष्ट मूर्तिकारांसाठी तीन प्रस्तावलोकमान्य गणेशोत्सव अभियानांतर्गत मंडळांसोबतच मूर्तिकारांकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून केवळ तीन मूर्तिकारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये हरिभाऊ राजाराम राऊत, देऊळगाव माळी, पंकज भारगड, चिखली, प्रा.योगेश आठवे, देऊळगाव राजा यांचा समावेश आहे. तालुकानिहाय प्रथम क्रमांक मिळालेले गणेश मंडळबुलडाणा - रुद्र गणेश मंडळ संगम चौक, चिखली - सहकार्य गणेश मंडळ, डी.पी. रोडदेऊळगाव राजा -बाथ्री तेली गणेश मंडळ,सिंदखेड राजा -कुमार गणेश मंडळलोणार -नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, सुलतानपूरमेहकर -श्रीचंद्र गणेश मंडळखामगाव -तानाजी व्यायाम शाळाशेगाव -लिओ गणेश मंडळसंग्रामपूर -नवयुवक गणेश मंडळ, वरवट बकालजळगाव जामोद -जय बजरंग गणेश मंडळ, सावरगावमलकापूर -लेवा नवयुवक गणेश मंडळ मोताळा -नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, पान्हेरा खेडी    लोकमान्य गणेशोत्सव अभियानातील १२ तालुक्यांतील प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. या मंडळांना लवकरच बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सहभागी मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.- अशोक सोनोने, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बुलडाणा