शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर गाव स्पर्धेत माकोडी जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:40 IST

बुलडाणा : आर. आर. (आबा) पाटील यांचे पुण्यतिथी निमित्ताने १६ फेब्रुवारी रोजी सन २०१९-२० अंतर्गत तालुका सुंदर व ...

बुलडाणा : आर. आर. (आबा) पाटील यांचे पुण्यतिथी निमित्ताने १६ फेब्रुवारी रोजी सन २०१९-२० अंतर्गत तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सुंदर गाव स्पर्धेत माेताळा तालुक्यातील माकाेडी गावाने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्षा कमल बुधवत, सभापती रियाजखँ पठाण, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पं.स. मोताळा सभापती प्रकाश बस्सी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनिषा पवार म्हणाल्या, या स्पर्धेत सहभाग नोंदवीत पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतींपासून अन्य ग्रामपंचायतींनी प्रेरणा घ्यावी. पुढील वर्षी आपल्या ग्रामपंचायतीला कसे पारितोषिक मिळेल, यादृष्टीने काम करावे. ग्रामविकासाच्या योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवून ग्रामपंचायतींनी आपली ग्रामविकासातील भूमिका अधोरेखित करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले. त्यांनी स्पर्धेची माहिती दिली. सन २०१९-२० चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव स्पर्धेतील पारितोषिक विजेते ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी (पंचायत) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार योजनेंतर्गत राज्य शासनाकडून तालुका सुंदर गाव याकरिता १० लक्ष रुपये व जिल्हा सुंदर गाव याकरिता ४० लक्ष रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार पारितोषिक विजेत्या गावांना पारितोषिक रकमेचा धनादेश देण्यात आला. संचालन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभारप्रदर्शन सहा. गट‍ विकास अधिकारी भरत हिवाळे यांनी केले.

या ग्रामपंचायतींना मिळाला पुरस्कार

जिल्हा सुंदर गाव पुरस्कार विजेती ग्रामपंचायत : माकोडी ता. मोताळा, तालुका सुंदर गाव पारितोषिक विजेत्या ग्रामपंचायती : बुलडाणा-हतेडी खु, चिखली-सावरगाव डुकरे, दे. राजा - खल्याळ गव्हाण, सिं.राजा-आडगाव राजा, मेहकर-आंध्रुड, लोणार-आरडव, खामगाव-वझर, शेगाव-खातखेड, संग्रामपूर-उमरा, जळगाव जामोद-सुनगाव, नांदुरा-खुमगाव, मलकापूर-विवरा, मोताळा-माकोडी.