शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

किन्होळावासीयांनी उभारले जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:56 IST

लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या या आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी कौतुक केले असून लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरचा किन्होळा ...

लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या या आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी कौतुक केले असून लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरचा किन्होळा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.

३ मे रोजी किन्होळा गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर बाहेकर यांच्या हस्ते या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या सेंटरचे मुख्य संकल्पक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, शासकीय कोविड सेंटरचे प्रभारी डॉ. सचिन वासेकर, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ, सरपंच अर्चना वसंत जाधव उपस्थित होते. उपरोक्त मान्यवरांनी यावेळी संपूर्ण आयसोलेशन सेंटरची पाहणी केली. यावेळी किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल साळोख, डॉ. अनिल पांढरे, डॉ. आकाश सदावर्ते, डॉ. स्वप्निल अनाळकर, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. भाग्यश्री खेडेकर, डॉ. दीपाली महाजन, उपसरपंच कल्पना राजपूत, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर, मधुकर बाहेकर, ग्रा. पं. सदस्य शेख आरिफ शेख रज्जाक, ग्रामसेवक रमेश मुंडे, कृषी सहाय्यक विष्णू डुकरे, शेख ताहेर शेखजी, भगवानसिंग राजपूत, दिनकर बाहेकर, बबनराव बाहेकर, अ‍ॅड. विश्वासराव बाहेकर व शिक्षकवृंदासह अनेक मान्यवर आणि गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

तुपकरांची साद, किन्होळावासीयांचा प्रतिसाद!

गावागावांत आयसोलेशन सेंटर उभारून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे केली होती. किन्होळा गावामध्ये ५ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. या गावात तत्काळ आयसोलेशन सेंटर उभारून कोरोनाला आळा घालण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचा तुपकरांनी निश्चय केला. चार दिवसांपूर्वी त्यांनी या संदर्भात किन्होळा गावातील ज्येष्ठ आणि तरुण दोन्ही वर्गाची भेट घेऊन आपला संकल्प बोलून दाखविला. गावचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रभूकाका बाहेकर, सरपंच अर्चना जाधव, वसंत जाधव आणि ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांनी याला पाठिंबा दिला. भारत विद्यालयाचे प्रा. अरविंद पवार यांनी विविध समित्यांचे गठन करून कामात सुसूत्रता आणली. गावातील जवळपास ५० पेक्षा अधिक तरुण स्वयंसेवक म्हणून विविध समित्यांच्या माध्यमातून कार्यरत झाले आहेत.

किन्होळा पॅटर्न यशस्वी करण्याची जबाबदारी गावकऱ्यांची : चावरिया

किन्होळा कोविड आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी संवाद साधताना जि. पो. अ. अरविंद चावरिया यांनी किन्होळा गावातील लोकांच्या समर्पित भावनेचे कौतुक करून कोविड आयसोलेशन सेंटरचा उपक्रम एकजुटीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.