शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंग फॅक्टरीत आग

By admin | Updated: February 19, 2017 02:11 IST

साडेसहा लाखांचे नुकसान

चिखली, दि. १८- येथील एमआयडीसीस्थित गुरू गणेश जिनिंग अँण्ड प्रेसिंग फॅक्टरीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून जिनिंगची स्वत:ची सुसज्ज अग्निशमन यंत्रणा तसेच पालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.येथील एमआयडीसी परिसरात राहुल इंदरचंद जैन यांच्या मालकीची गुरू गणेश जिनिंग अँण्ड प्रेसिंग फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत नेहमीप्रमाणे कापसाची गाळप सुरू असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली. या फॅक्टरीत सर्वत्र रूई असल्याने काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र, आगीच्या अशा घटनांपासून संरक्षण व्हावे, यासाठी जिनिंग चालकांनी सर्वत्र सुसज्ज अग्निशमन यंत्रणा उभारलेली असल्याने जिनिंग व फॅक्टरीतील कर्मचार्‍यांनी या अग्निशमन यंत्रणेद्वारे आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तसेच या आगीची माहिती नगर पालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या अग्निशामक दलानेही तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या घटनेत जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीमधील कापूस तसेच कन्व्हर्ट बेल्ट सिस्टीम जळाल्याने सुमारे साडेसहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसानही टळले आहे.