मेहकर
शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत असूनही दुकानदार शहरात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत़ शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. शासनाने संचारबंदी लागू करून जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी ७ ते ११ वेळ दिल्यानंतरही शहरात अनेक दुकानदार मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. शहरातील अनेक दुकानदार दुकानाच्या आत मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय करून मालाची विक्री करीत आहे़ साेमवारी शहरातील दीपक कापड दुकान सुरू असल्याची माहिती नगर परिषदेच्या पथकाला मिळाली़ या माहितीच्या आधारे पथक तत्काळ दीपक कापड दुकानात पोहोचले़ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली व २०............. मास्क न लावता आढळले़ त्यामुळे दुकानदाराला दहा हजार रुपयांचा दंड व मास्क न लावणाऱ्यांना दंड केला आहे़ नगर परिषदेने असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़ शहरात अशी अनेक दुकाने नियमांचे उल्लंघन करीत असून असे दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे़