शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर शिक्षिका ठग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:52 IST

खामगाव : एकाच वेळी शाळेच्या स्वाक्षरी पटावर उपस्थिती दर्शवून एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या एका शिक्षिकेविरोधात गटशिक्षणाधिकार्‍यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या स्वाक्षरी पटावर नियमीत सही करून सध्या सोनाळा ता. संग्रामपूर येथे कार्यरत असलेल्या शिक्षिकेने एमएडच्या अभ्यासक्रमासाठी अध्यापक विद्यालयातही विद्यार्थीनी म्हणून प्रवेश घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या शिक्षिकेविरोधात ४ ...

ठळक मुद्देएकाच वेळी शाळेच्या स्वाक्षरी पटावर उपस्थिती दर्शवून एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेशगटशिक्षणाधिकार्‍यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

खामगाव : एकाच वेळी शाळेच्या स्वाक्षरी पटावर उपस्थिती दर्शवून एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या एका शिक्षिकेविरोधात गटशिक्षणाधिकार्‍यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या स्वाक्षरी पटावर नियमीत सही करून सध्या सोनाळा ता. संग्रामपूर येथे कार्यरत असलेल्या शिक्षिकेने एमएडच्या अभ्यासक्रमासाठी अध्यापक विद्यालयातही विद्यार्थीनी म्हणून प्रवेश घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या शिक्षिकेविरोधात ४ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या चिखला येथील जिल्हा परिषद शाळेवर श्रीमती कल्पना भगवान ठग ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी सन २0१२-१३ मध्ये बी.एड. व सन २0१३-१४ मध्ये एम.एड. अभ्यासक्रम पूर्ण केला. यासाठी त्यांनी शाहू महाराज अध्यापक विद्यालय माळविहीर येथे रितसर प्रवेश घेतला होता. तसेच चिखला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरही उपस्थित असल्याचे हजेरी पटावरून दिसून आले. या संदर्भात शिक्षिका ठग यांनी फसवणूक केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे शासनाच्या आदेशावरून गटशिक्षणाधिकारी एम.वाय. आंधळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कल्पना ठग यांच्याविरूध्द ४२0 चा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खामगाव येथील पत्रकार संजय वर्मा यांनी १५ जानेवारी २0१६ रोजी तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग तसेच तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी दिपा मुधोळ व कल्पना ठग यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र त्यावेळी कारवाई न झाल्याने उपरोक्त तीघी विरोधात गुन्हा दाखल होवू शकला नाही. दरम्यान शासनाची फसवणूक करणार्‍या कल्पना ठग यांच्याप्रमाणेच  त्यांची पाठराखण करणार्‍या तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी दिपा मुधोळ आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय वर्मा यांनी केली आहे.