शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले फाैजदारी कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST

बुलडाणा : लाेणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता विद्यालयाला बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदी भाषिक अल्पसंख्य विभागाचा दर्जा मिळविल्याप्रकरणी ...

बुलडाणा : लाेणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता विद्यालयाला बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदी भाषिक अल्पसंख्य विभागाचा दर्जा मिळविल्याप्रकरणी दाेषीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून राेजी दिले आहेत. यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही मुख्याध्यापकांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा आदेश दिले आहेत.

तत्कालीन शिक्षणाधिकारी पानझडे यांनी २५ जून, २०२० राेजी मुख्याध्यापक, जनता विद्यालय अंजनी खुर्द व इतर यांना बनावट दाखले तयार करून सादर करणाऱ्या दोषी व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते, तसेच फाैजदारी कारवाई न झाल्यास वेतन व भत्ते थाबवून शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला हाेता. तरीही संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडून गुन्हे दाखल न झाल्याने शिक्षणाधिकारी यांना तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अंजनी खुर्द येथील जनता विद्यालयाला अध्यक्ष व संचालकांनी बनावट कागदपत्रे सादर करून, अल्पसंख्या दर्जा मिळविल्याची तक्रार केशरबाई गायकवाड यांनी केली हाेती. या प्रकरणी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने चाैकशी करण्यात आली हाेती. चाैकशीत बनावट कागदपत्रे सादर करून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त केल्याचे समाेर आले हाेते. त्यामुळे दाेषीवर फाैजदारी कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना दिले हाेते. संबंधित मुख्याध्यापकांनी कुठलीही कारवाई न केल्याने, तक्रारकर्त्या गायकवाड यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून राेजी शिक्षणाधिकाऱ्यांना दाेषीवर फाैजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.