शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जप्त रेशन तांदूळप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: April 4, 2017 00:49 IST

जप्त रेशन तांदूळप्रकरणी नांदुरा पोलिसांनी ओमप्रकाश राठी याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

नांदुरा : तहसीलदार वैशाली देवकर यांच्या पथकाने शनिवार, १ एप्रिलच्या रात्री बाजार समिती मागील बुलडाणा रोडजवळ असलेल्या राठी यांच्या शेतातील गोडावूनवर छापा टाकून रेशनचे १८४ कट्टे तांदूळ जप्त केला होता. अखेर २६ तासानंतर २ एप्रिलच्या रात्री ११ वाजेदरम्यान नांदुरा पोलिसांनी ओमप्रकाश राठी याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.तालुक्यात रेशन माफिया मोठ्या प्रमाणात धान्याची अफरातफर करीत असल्याने गोरगरिबांचे धान्य काळ्या बाजारात जात असल्याची ओरड होती. यापूर्वीचे पुरवठा अधिकारी व गोदाम निरीक्षक बरगे यांच्याविरुद्ध तक्रारी झाल्या होत्या. मात्र, याबाबत ठोस माहिती प्राप्त होताच तहसीलदार वैशाली देवकर यांनी पथकासह द्वारपोच धान्य योजनेचे शासकीय कंत्राटदार तथा रेशन दुकानदार ओमप्रकाश राठी यांच्या शेतातील गोदामावर अचानक १ एप्रिलच्या रात्री छापा टाकला असता, त्यांच्या गोदामात १८४ कट्टे तांदूळ आढळून आला. तसेच त्यांच्या गोदामाबाहेर शासकीय कट्टे आढळून आल्याने तहसीलदार देवकर यांनी पंचनामा केला होता.याबाबत पुरवठा निरीक्षक गजानन राजगडे मलकापूर यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री ११ वाजता ओमप्रकाश राठीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर कांदुरे करीत आहेत. तालुक्यात रेशन माफिया सक्रिय झाल्याने सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच आता व्दारपोच योजनेचा शासकीय कंत्राटदारच्याच गोडावूनमध्ये रेशनचा तांदूळ व बाहेर शासकीय मालाचे खाली कट्टे आढळल्याने द्वारपोच योजनेतच गौडबंगालचे गुपीत उघड झाले आहे. तसेच यापूर्वीच पुरवठा अधिकारी व गोदाम निरीक्षक बरगे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारींवर वेळेतच योग्य कारवाई झाली असती, तर तालुक्यात रेशन माफियांवर नियंत्रण मिळवता आले असते. त्यामुळे आता पुरवठा विभागाने सर्व कर्मचाऱ्यांची चाचपणी करणे गरजेचे झाले आहे.