शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडादिनी चढणार फिफा फुटबॉल विश्‍वचषकाचा ज्वर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:15 IST

बुलडाणा : १९ वर्षाखालील फिफा विश्‍वचषक भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या प्रचार- प्रसाराकरिता    क्रीडा दिनाचा मुहूर्त शोधण्यात आला असून, राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा आयोजित करून विश्‍वचषकासाठी वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देप्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धा १९ वर्षाखालील फुटबॉल विश्‍वचषकाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : १९ वर्षाखालील फिफा विश्‍वचषक भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या प्रचार- प्रसाराकरिता    क्रीडा दिनाचा मुहूर्त शोधण्यात आला असून, राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा आयोजित करून विश्‍वचषकासाठी वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे.  भारतात क्रिकेटचाच बोलबाला असून, अन्य खेळांकडे साहजिकच दुर्लक्ष होते. त्यामुळे फुटबॉल विश्‍वचषकाबाबत खेळाडूंमध्ये माहिती व्हावी, खेळाडू फुटबॉलकडे वळावे, याकरिता शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिन साजरा केल्या जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शाळेत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा - शाळांमधील फुटबॉल खेळाडू आपआपसात भिडणार आहेत. ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंपर्यंंत विश्‍वचषकाची माहिती पोहोचावी व त्यांचाही या स्पर्धेला पाठिंबा मिळावा, त्याकरिता शाळास्तरीय स्पर्धा राबविण्यात येत आहे.  सध्या संपूर्ण राज्यात फुटबॉलच्या तालुकास्तरीय स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धांंमधून विजयी होणारी चमू जिल्हा स्तरावर खेळण्यात येणार्‍या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर विभागीय स्तर व राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत. राज्यस्तरावरील स्पर्धा पार पडल्यानंतर देशपातळीवर स्पर्धा होणार असून, या स्पर्धतील उत्कृष्ट खेळाडूंची देशाच्या संघात निवड करण्यात येणार आहे. सदर संघ फिफा विश्‍वचषकात खेळणार आहे.  १४, १७ वर्षाखालील खेळाडूंच्या स्पर्धा सुरू १९ वर्षाखालील फिफा विश्‍वचषक स्पर्धा यावर्षी आक्टोबर महिन्यात भारतात खेळल्या जाणार आहेत. या पृष्ठभुमीवर बुलडाणा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय १४ वषार्खालील व १७ वर्षाखालील खेळाडुंच्या फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत १४ वर्षाखालील ११ संघ, १७ वर्षाखालील ८ संघातील ३४२ खेळाडुंनी सहभाग घेतला आहे. तालुका स्तरावरील या फुटबॉल स्पर्धेत जिंकण्याच्या ईर्षेने खेळाडुंनी आपला सहभाग नोंदविला व मैदानावर चुरशीच्या लढती प्रेक्षकांना बघावयास मिळाल्या.

फिफा विष्वचषक स्पर्धेच्या जनजागृतीसाठी राज्यस्तर शाळांमध्ये शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळा शाळांमधील खेळाडू फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामुळे निश्‍चितच खेळाडूंमध्ये विश्‍वचषकाबाबत जनजागृती होणार आहे.   - सय्यद दाऊद ,उपप्राचार्य उर्दू हायस्कूल, बुलडाणा