शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात अन्न सुरक्षा सप्ताहाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 12:05 IST

Fiasco of Food security week in Buldana district :  ‘अन्न सुरक्षा सप्ताहा’ची साखळीही खंडित झाल्याचे समोर येत आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जुलै महिन्यात ई-पॉस मशीनमध्ये डाटा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील रेशन वितरण विस्कळीत झालंय. पुरवठा विभागाच्या तांत्रिक गोंधळामुळे  ऐन सणासुदीच्या दिवसात नियमित आणि मोफत धान्य विरतण रखडले असून  ‘अन्न सुरक्षा सप्ताहा’ची साखळीही खंडित झाल्याचे समोर येत आहे. नियोजित मुदतीत धान्य वितरण न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. रेशन वितरण प्रणालीत पादर्शकता आणण्यासाठी शासनाने रेशन दुकानदारांना पॉइंट ऑफ सेल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या मशीनद्वारे धान्य वितरित केल्या जात आहे. मात्र,  पुरवठा विभागातील तांत्रिक गोंधळामुळे, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही नियमित आणि मोफत धान्य वितरण रखडले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या दिवसातच ‘अन्न सप्ताहाचा’ बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मागील महिन्यातील मोफत आणि नियमित धान्य वाटप रखडले आहे.

गोदाम पालकांचा पुरवठा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार!माहे जुलैच्या वाटपामुळे जिल्ह्यातील गोदामात धान्य साठा करण्यास जागा शिल्लक नसल्याचा पत्रव्यवहार जिल्ह्यातील बहुतांश गोदाम पालकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी केला आहे. ई-पॉस मशीनमध्ये डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक स्वस्त धान्य दुकानदार धान्याची उचल करण्यास इच्छुक नाहीत. धान्य वाटप प्रभावित झाल्याचे स्पष्ट करीत गोदामामध्ये जागा उपलब्ध नसल्याचे पत्रात नमूद करीत यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

काय आहे अन्न  सुरक्षा सप्ताह!प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा हा अन्न सुरक्षा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. यामध्ये १० तारखेपर्यंत धान्याचे वितरण पूर्ण करण्याचे नियोजन ठरले असते. तर महिन्याच्या १ ते १५ या तारखेपर्यंत नवीन परमिट वितरित केल्या जातात. मात्र तांत्रिक गोंधळामुळे यात समस्या निर्माण झाली आहे.

नियमित वाटपही रखडले!बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात १७ जुलैपर्यंत धान्य वितरणासाठी परमिट पोहोचले नव्हते. त्यामुळे वाटप रखडले असून, द्वारपोच योजनेचेही काम थंड बस्त्यात आहेमशीनमध्ये डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे मागील महिन्यातील मोफत आणि नियमित धान्य वाटप रखडले आहे.

टॅग्स :foodअन्नkhamgaonखामगावbuldhanaबुलडाणा