शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कमी कर्मचार्‍यांचा ग्राहकांना फटका

By admin | Updated: August 4, 2014 23:20 IST

स्टेट बॅकसमोर दिवसभर रांगा : वृद्धांनाही बसावे लागते ताटकळत

मेहकर : स्थानिक भारतीय स्टेट बँकेत कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. त्यामुळे अनेकांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे महिलांसह वृद्धांनां त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन असो की, सर्वसामान्यांचे व्यवहार ; सर्व व्यवहार भारतीय स्टेट बँकेत होतात.आता शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसेच शासनाच्यावतीने निराधार व वृद्धांना मिळणारा आर्थिक लाभही दिला जातो. यासह शेतकर्‍यांचे पीक कर्ज काढणे, पीक विमा भरणे आदी व्यवहारही भारतीय स्टेट बँकेतूनच करण्यात येतात. अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटक भारतीय स्टेट बँकेशी जोडला गेलेला आहे. तसेच दिवसेंदिवस भारतीय स्टेट बँकेत ग्राहकांची संख्या वाढत आहे. परंतू, वाढत्या ग्राहक संख्येच्यातुलनेत बँकेतील सुविधा मात्र नियोजन शुन्य दिसून येत आहेत. बँकेत कर्मचारी व काऊंटरचा अभाव असल्याने पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी होत आहे. येथे वृद्ध, महिला यांच्यासाठी स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था नसल्याने त्यांनाही ताटकळत बसावे लागत आहे. तर बँकेत वेळीच कामे होत नसल्याची ओरडही ग्राहकांमधुन वारंवार होत आहे. पीक विमा काढण्यासाठी शेतकर्‍यांची स्टेट बँकेत गर्दी होत आहे. येथील एटीएम मशीनही कित्येक दिवसांपासून बंद असल्याने पैसे काढण्यासाठी प्रत्येकाला बँक गाठावी लागत आहे. त्यामुळे बँकेतील गर्दी अधिकच वाढत असून, त्यासाठी काऊंटर वाढविणे गरजेचे झाले आहे.