शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जानेफळ परिसरात सर्दी, खोकल्यासह तापेचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार ...

सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार जण आजारी पडलेले दिसत आहेत. ज्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असून, सध्या शेतातील काम धंद्याचे दिवस असताना ते सोडून दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे. अशातच खासगी दवाखान्यातील इंजेक्शन व सलाइनचे दर सुद्धा वाढविण्यात आले असल्याने याचा फटका जनतेला सोसावा लागत आहे. सर्दी व खोकला हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा लगेच फैलाव होत आहे. पावसाळ्यामुळे आलेले नवीन पाणी पचण्यास बाधक ठरत असल्यामुळे सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. नाल्यांंमधील घाण पाण्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढल्याने ताप व इतर आजारांचे रुग्ण सापडत आहेत.

ओपीडी वाढली

दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात या आजाराचे प्रमाण बळावत असते. त्यानुसार यावर्षी अल्प पाऊस आणि त्यातच उन्हाळ्याप्रमाणेच असलेले गरमीचे वातावरण हे आरोग्यास बाधक ठरत असल्याने या आजाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे.

रुग्णांनी व जनतेने काळजी घ्यावी : सरपाते

आजारी रुग्णांनी घरगुती उपचार न करतात तज्ज्ञ डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय अशा ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा. उपचारात निष्काळजी करू नये. तसेच जनतेने व्हायरल फीवर, जलजन्य आजार, विषाणूजन्य आजार इत्यादीपासून बचावासाठी पाणी उकळून प्यावे. घर, परिसर स्वच्छ ठेवावे आणी डास व मच्छरांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी केले आहे.