शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे बजेट बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:22 IST

Buldhana News : पन्यांनी खतांच्या किमतीत सुमारे ६०० ते ८०० रुपयांच्या फरकाने मोठी वाढ केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर कंपन्यांनी खतांच्या किमतीत सुमारे ६०० ते ८०० रुपयांच्या फरकाने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच लागवड खर्च दुप्पट होणार असून, शेतकऱ्यांचे बजेट खतांच्या भावाने बिघडले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना ६ हजार रुपये  वार्षिक सन्मान निधी देण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे खत दरवाढीतून त्याच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करायची, असे दुटप्पी धोरण केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे ही भाववाढ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खा.प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.नैसर्गिक आपत्तीची सुरू असलेली मालिका त्यातच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनचा सामना गतवर्षीपासून शेतकरी करत आहेत. भाजीपाला आणि नगदी पिकांचे रास्त भाव शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या प्रश्नात लक्ष घालण्यात यावे, असेही १८ मे रोजी पाठविलेल्या पत्रात खा.जाधव यांनी नमूद केेल आहे. साधारणतः पाच एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी जर आपण डोळ्यासमोर ठेवला, तर त्याला वर्षभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक धरून १५ बॅग खत लागते. त्यामुळे एका खताच्या बॅगमागे सहाशे ते सातशे रुपये वाढले आहेत. त्यामुळे खताच्या खरेदीसाठी दहा हजार रुपये अधिकचे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार आहेत. 

भाववाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष सन्मान निधी मिळतो, पण तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने हे धोरण बदलावे. या भाववाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, असे खा.जाधव यांनी म्हटले आहे. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी खत दरवाढीचा बोजा त्यांच्यावर लादून काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री यांनी या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष घालून दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी