शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्याची चणचण

By admin | Updated: June 12, 2016 02:49 IST

घरगुती बियाण्यांपासून शेतकरी वंचित : १ लाख ३१ हजार ५0८ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता कमी.

ब्रह्मनंद जाधव / बुलडाणा गतवर्षी सोयाबीन उत्पादनात मोठय़ा प्रमाणावर घट झाली. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांकडे सोयाबीनचे घरचे बियाणे उपलब्ध नाही, तसेच बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून, १ लाख ४५ हजार ८५५ क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी आहे; मात्र जिल्ह्यात केवळ १४ हजार ३४७ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याने मागणीच्या तुलनेत सुमारे १ लाख ३१ हजार ५0८ क्विंटल सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना आता सोयाबीन बियाण्याची चणचण असल्याने बियाणे मिळविण्यासाठी परवड होत आहे.बुलडाणा जिल्ह्यात काही वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील जवळपास ७0 टक्के शेतकरी सोयाबीन पीक घेतात; परंतु गत तीन वर्षांपासून पावसाच्या हुलकावणीचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन उत्पादनात ७५ टक्के घट झाली, तर ज्या शेतकर्‍यांच्या शेतात सोयाबीन आले तेदेखील ज्वारीच्या आकाराचेच झाले. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ४८ हजार हेक्टर असून, यंदा कृषी विभागाने ७ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे, तर गतवर्षी सोयाबीन पेरणीसाठी ३ लाख ४४ हजार ९६0 हेक्टरचे नियोजन होते. यंदा ३ लाख ७८ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे नियोजन करण्यात आले आहे, तर इतर क्षेत्रावर ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, ऊस, कापूस आदी पिके घेण्यात येणार आहेत; परंतु गतवर्षी सोयाबीन उत्पादनाला फटका बसल्याने शेतकर्‍यांकडे यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी सोयाबीनचे घरचे बियाणेच उपलब्ध नाही, तसेच जिल्ह्यात १ लाख ४५ हजार ८५५ क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी असून, केवळ १४ हजार ३४७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत सुमारे १ लाख ३१ हजार ५0८ क्विंटल सोयाबीन बियाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकर्‍यांना बियाण्याची कमतरता भासणार आहे.