शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफडीए’ने जप्त केलेल्या गुटख्याचे पंचनामे गुंतागुंतीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:31 IST

एफडीएने कारवाई करताना अपेक्षीत पथ्थे न पाळल्यामुळे अगदी शुन्यातून पोलीसांना ही प्रक्रिया पारपाडावी लागत असल्याने हे पंचनामे गुंतागुंतीचे बनले आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एफडीएच्याबुलडाणा येथील गोडाऊनमधून दोनदा जप्त केलेला गुटखा चोरी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एफडीएने केलेल्या कार्यवाहीतील जप्त गुटख्याची पडताळणी करून प्रत्यक्षात किती गुटखा चोरीला गेला याचा अहवाल इन कॅमेरा पडताळणी करून देण्याचे पोलीस प्रशासनास पालकमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. मात्र पीआय, एपीआय दर्जाचे दोन अधिकारी यांच्यासह अर्धाडजन पोलीस कर्मचारी सध्या दोन दिवसांपासून जप्त गुटख्याची पडताळणी करून तो सील बंद करत आहेत. मुळात एफडीएने कारवाई करताना अपेक्षीत पथ्थे न पाळल्यामुळे अगदी शुन्यातून पोलीसांना ही प्रक्रिया पारपाडावी लागत असल्याने हे पंचनामे गुंतागुंतीचे बनले आहे.एफडीचेच्या बुलडाणा येथील गोडावूनमधून दोन लाख ८० हजार रुपयांचा जप्त केलेला गुटखा चोरीला गेला होता. त्यानंतर १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा या गोडावूनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता. याची कुणकूण लागताच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १४ फेब्रुवारीला रात्रीच अचानक एफडीएच्या बुलडाणा कार्यालयाची झडती घेतली. जप्त केलेला गुटखा आणि प्रत्यक्ष चोरी गेलेला गुटखा याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. बुलडाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंके, एपीआय अभय पवार, पीएसआय अमित जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांनी शनिवारीच जप्त केलेल्या मालाची मोजदाद इन कॅमेरा करीत गुटखा सिलबंद केला. मात्र मुळातच एफडीएने गुटखा जप्तीची कारवाई करताना त्याची नोंद व जप्तीची कार्यवाही योग्य पद्धतीने केली नाही. त्यामुळे पोलिसांना पंचना व पडताळणी कारवाई करणे अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे.मंगळवारी देणार अहवालबुलडाणा शहर पोलिस सोमवारी उर्वरित गुटख्याची मोजणी करून प्रत्यक्ष जप्त केलेला गुटखा व चोरी गेलेला गुटखा याची तफावत स्पष्ट करणार आहेत. तसा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून वरिष्ठांना सादर करण्यात येणार येणार आहे.दोघांचे पदभार काढलेबुलडाण्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) अनिल राठोड आणि अन्न सुरक्षा अधिकारी एन. एम. नवलकार यांचा पदभार १३ फेब्रुवारी रोजीच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त ए. बी. उन्हाळे यांनी काढला असून त्यांच्या जागी अनुक्रमे अमरावती येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. डी. केदारे आणि मुंबई मुख्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी आस. डी. सोळंके यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना आता अमरावती येथील कार्यालयाच्या नियंत्रणात काम करण्याचे निर्देशीत केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFDAएफडीए