शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या विद्युत तारा ठरताहेत जीवघेण्या!

By admin | Updated: August 15, 2016 02:36 IST

मेंटेनन्स एजन्सी नसल्यामुळे अडचण; महिनाभरापासून खांबावरील विद्युत तारा तुटून पडल्या; वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष.

लोणार(जि. बुलडाणा), दि. १४ : तालुक्यात वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची मेंटेनन्स एजन्सी नसल्यामुळे अनेक शेतशिवारात विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटून पडलेल्या आहेत. ऐन पावसाळ्यात अशा भयानक परिस्थितीमुळे जीवित हानी व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोणार तालुक्यात पानस शिवारात गेल्या महिनाभरापासून खांबावरील विद्युत तारा तुटून पडलेल्या आहेत. याबाबत शेतकरी ज्ञानेश्‍वर रुस्तमराव मापारी यांनी विद्युत वितरण कंपनीच्या तक्रार नोंदवहीत महिनाभरापूर्वी तक्रार नोंदविली. तसेच याबाबत वारंवार तोंडी पाठपुरावाही केला. परंतु कर्मचारी नसल्याचे सांगून कर्तव्यापासून हात झटकण्याचे काम उपकार्यकारी अभियंता मुचलवार यांनी केल्याचा अनुभव ज्ञानेश्‍वर मापारी यांना आला. याबाबत मुचलवार यांना विचारणा केली असता काही दिवसातच काम करवून देतो, असे आश्‍वासन त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीला दिले. परंतु दोन महिन्याचा कालावधीनंतरही विद्युत तारा लोंबकळलेल्या असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये जीवित हानी व वित्त हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्युत तारा तुटून पडलेल्या असल्यामुळे शेतामधील वीज पुरवठाही खंडित झालेला आहे. यामुळे शेतकर्‍यांना शेतीसाठी व पिण्यासाठी घरुनच वा विकत पाणी घ्यावे लागत आहे. विद्युत वितरण कंपनीचा चाललेल्या भोंगळ कारभाराकडे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लक्ष देऊन शेतकर्‍यांसाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणीही शेतकरी ज्ञानेश्‍वर मापारी यांनी केली आहे.