शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बापाची आजारी पोराच्या जीवनासाठी धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:09 IST

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाच्या दोन्ही किडण्या निकामी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दोन्ही किडण्या निकामी झालेल्या मुलाच्या उपचाराकरिता वृद्ध शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. घर, शेत विकूनही उपचारासाठी अधिक पैशांची गरज असल्यामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी भीमराव अंभोरे हतबल झाले आहेत. मेहकर तालुक्यात शेती करणारे भीमराव अंभोरे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी गतिमंद आहे. त्यांनी चांगले शिक्षण देत मोठा मुलगा सुदर्शन याला सॉफ्टवेअर इंजिनियर केले. सुदर्शनने शिकवणी घेण्याला सुरुवात केली. सुमारे शंभर विद्यार्थी सुदर्शनकडून संगणकाचे ज्ञान घेत होते. आई -वडिलांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतले आहे. आता त्यांच्या हितासाठी झटण्याचा त्याने निश्चय केला. हे सुखी कुटुंब आनंदाने जीवन जगत होते; मात्र काळाला हे मान्य नव्हते. एक दिवस अचानक सुदर्शन रस्त्यावर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखविले असता, त्याच्या दोन्ही किडणी निकामी झाल्याची माहिती सुदर्शनच्या आई - वडिलांना कळली. सुदर्शनच्या वडिलांनी त्यांचे अर्धे घर विकले. आपल्या चार एकर शेतीतून पावणेदोन एकर शेतीही विकली; पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडत चालली होती. आई, वडील, भाऊ, बहीण प्रत्येकांना आपली तरी किडणी सुदर्शनला वाचवू शकेल, या उद्देशाने सर्व चाचण्या केल्या; मात्र सर्वांच्याच किडणी जुळत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेवटी ते हतबल झाले होते. तेव्हा माध्यमांच्याद्वारे अनेक दानशुरांनी पुढे येऊन आपला मदतीचा हात त्यांच्या पुढे केला. पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात २०१५ मध्ये एक ब्रेन डेड व्यक्तीच्या किडनीचे प्रत्यारोपण सुदर्शनवर करण्यात आले. सुदर्शनवर शस्त्रक्रिया झाली; मात्र काही महिन्यातच त्याच्या नाकातून आणि लघवीतून रक्त वाहू लागले. डॉक्टरांनी त्याला मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार केईएम रुग्णालयात उपचार सुरू होता. जीवनदायी योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत संपल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर आसपासच्या काही संस्थांनी भीमराव यांना काही मदत केली. आपल्या मुलाला होत असलेल्या यातना बघून भीमराव यांचे मन खचून गेले आहे.