शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना मारणार्‍या पित्यास कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:36 IST

मलकापूर: पत्नीशी उद्भवलेल्या वादातून पतीने ४ वर्षीय मुलगी व अडीच वर्षीय चिमुकल्यास गळा दाबून जखमी करीत पोबारा केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी शहरातील बारादरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी त्या निर्दयी पित्यास सावदा फैजपूर येथून अटक करीत ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.

ठळक मुद्देपत्नीशी उद्भवलेल्या वादातून पतीने उगारला मुलांवर आसूड

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: पत्नीशी उद्भवलेल्या वादातून पतीने ४ वर्षीय मुलगी व अडीच वर्षीय चिमुकल्यास गळा दाबून जखमी करीत पोबारा केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी शहरातील बारादरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी त्या निर्दयी पित्यास सावदा फैजपूर येथून अटक करीत ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.वाघुळ येथील संगीता विष्णू गवळी (वय २५ वर्ष) ही विवाहिता ४ वर्षीय मुलगी रोशनी व अडीच वर्षीय मुलगा पीयूषसह शहरातील बारादारी या भागातील कपिल सनिसे या भावाकडे माहेरी आली होती. दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री संगीता व तिचा पती विष्णू नारायण गवळी यांच्यात भांडण झाले. या भांडणात विष्णूने मुलगी रोशनीचा गळा दाबून तिला घरातील पलंगाखाली फेकले, तर मुलगा पीयूष यास घरापासून अंतरावरील सुरेश ढोले यांच्या बांधकाम असलेल्या खड्डय़ामध्ये जखमी करून फेकून दिले व पोबारा केला. १२ ऑगस्ट रोजी सकाळी पीयूषसह रोशनीला उपजिल्हा रुग्णालयातून बुलडाणा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान बुलडाणा पो.स्टे.च्या पोउनि मनीषा हिवराळे यांनी संगीता गवळी यांचा जवाब घेत सदर कागदपत्रे मलकापूर शहर पो.स्टे.ला पाठवून दिले. याप्रकरणी संगीता यांचा जवाब घेत सदर कागदपत्रे मलकापूर शहर पो.स्टे.ला पाठवून दिले. याप्रकरणी संगीता गवळी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पिता विष्णू गवळीविरुद्ध  कलम ३0७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करीत त्यास १३ ऑगस्ट रोजी सावदा फैजपूर (जळगाव खा.) येथील रेल्वेस्थानवरून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली व न्यायालयासमोर हजर करीत न्यायालयाकडून १८ ऑगस्टपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. जखमी रोशनीवर बुलढाण्यातील डॉ. निकाळजे यांच्याकडे उपचार तर पीयूषवर  औरंगाबाद येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.