शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकातील जीवघेणा शॉर्टकट!

By admin | Updated: May 22, 2017 00:31 IST

प्रवाशांसमोर रेल्वे प्रशासनानेही टेकले हात : रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताची शक्यता

फहीम देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेखाली सापडून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात काहींना प्राण गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. तरीही रेल्वेरुळ ओलांडणे थांबत नाही. शेगावच्या रेल्वेस्थानकावरील फलाटावर पोहोचण्यासाठी दादऱ्याचा वापर न करता शॉटकटने जाण्यासाठी रेल्वे रुळाचा वापर अनेक प्रवाशांकडून केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने ही आता या प्रवाशांसमोर हात टेकल्याचे दिसून येते.शेगाव शहर हे संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले आहे. यामुळे येथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासठी भारतभरातून भाविक येथे पोचतात. यामुळे शेगाव रेल्वे स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. या शहरात येणाऱ्या बहुतांश पॅसेंजर गाड्या येथे खाली होतात व येथूनच भरुन जातात. अशावेळी रेल्वे गाडी पकडण्यासाठी प्रवाशी नेहमीच घाईगडबडीत असतात. त्यामुळे ते दादऱ्याऐवजी रेल्वे रूळ ओलांडत असून यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे रूळ ओलांडणे तसा कायद्याने गुन्हा आहे. मात्र प्रवाशांनी स्वत:च्याच जीवाशी खेळ चालवला आह़े रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने अनेकांना अपंगत्व येते तर प्रसंगी मरणही. मात्र हे सारे घडत असतानाही प्रवाशी आपल्या जीवाविषयीच बेफिकीर असल्याचे वास्तव शेगाव स्थानकावर दिवसभरात दिसून येत़े. शेगावच्या स्थानकावर दोनच प्लॅटफार्म आहेत़ प्लॅटफार्मवर एखादी एक्स्प्रेस उभी असल्यास मागावून येणारी गाडी दुसऱ्या प्लॅटफार्मवर घेतली जाते त्यामुळे प्रवासी घाईगर्दीत जिन्याचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे रूळ ओलांडतात़ गाडी पकडण्याच्या नादात मागावून एखादी गाडी येत आहे वा नाही याचीदेखील खातरजमा केली जात नाही त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आह़े अनेकदा तर धावत्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रवासी रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याच्या वा पाय कटून अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत़ घरून निघायला उशीर झाल्यास घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडून इच्छीत गाडी पकडताना देखील अनेकदा अपघात झाले आहेत मात्र त्यानंतरही प्रवाशांच्या मानसिकतेत बदल होत नाही़ दिवसभरात किमान ५० वर गाड्या थांबतात तर रेल्वे स्थानकासह परिसरात १००० वर प्रवासी रूळ ओलांडतात़. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा बलातर्फे नियमित कारवाई केली जाते तसेच रेल्वेस्थानकावर त्याबाबत लाऊड स्पीकवरून देखील प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन केले जाते, मात्र प्रवासी स्वत:च्याच जीवाविषयी बेफिकीर असल्याचे दिसून येते. रेल्वे अधिनियमात अशा प्रवाशांवर कारवाईची तरतूद आह़े रेल्वे न्यायालयात प्रवाशांवर शंभर रुपयांर्पयत त्यात दंड केला जातो़. शेगाव स्थानकावरून हजारो प्रवासी दिवसभरात प्रवास करतात़ मात्र घाईघाईत गाडी पकडण्याच्या नादात वा शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वे रूळ ओलांडला जात आह़े हा प्रकार म्हणजे थेट जीवाशी खेळण्याचा प्रकार आह़ेरेल्वे प्रशासनासाठी तापदायकरेल्वे स्थानकात शिरण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत़ प्रवासी वेळ वाचविण्याच्या नादात या शॉर्टकटचा वापर करतात, शिवाय धावती गाडी पकडण्यासाठी वा इच्छित प्लॅटफार्मवर जाण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडले जातात़. मात्र असले शॉर्टकट रेल्वे विभागाला तापदायक ठरत आहे.