शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे कर्जमुक्तीसाठी उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:48 IST

बुलडाणा: शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांसह संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अभिनव उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी आयोजित परिसंवादात शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची देशाला गरज असल्याचे भूमिका नामदेव जाधव यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपरिसंवादाचे आयोजन मिरवणुकीद्वारे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांसह संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अभिनव उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी आयोजित परिसंवादात शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची देशाला गरज असल्याचे भूमिका नामदेव जाधव यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. स्व. शरद जोशी यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी ११ वाजेपासूनच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते येथील जयस्तंभ चौकातील गांधीभवन येथे जमा झाले होते. १२ वाजेच्या सुमारास स्व. शरद जोशी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जोशी यांच्या प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. जयस्थंभ चौक येथून स्टेट बँक चौक मार्गे संगम चौक ते गांधी भवन मार्गे निघालेल्या मिरवणुकीत ‘इडा पीडा टाळणार आहे, बळीचे राज्य येणार आहे’, ‘भीक नको हवे घामाचे दाम’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.मिरवणूक गांधी भवन येथे दाखल होताच शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफी आणि वीज बिल मुक्तीसाठी एक दिवसीय उपोषणाला सुरुवात करण्यात आली. ‘मी अनुभवलेले शरद जोशी’ या परिसंवादात  नामदेव जाधव यांनी शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची आज देशाला गरज असल्याचे सांगून जोशी यांच्या विचारांशिवाय शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ येऊ शकणार  नसल्याचे सांगितले. अव्यहारी स्वामिनाथन आयोगापेक्षा स्व. शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवाल लागू करण्याची मागणीही जाधव यांनी यावेळी केली. डॉ. हासन देशमुख यांनी कर्जमाफीवरून सरकारचा खरपूस समाचार घेत फसव्या कर्जमाफीपेक्षा शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. एकनाथ पाटील यांनी शरद जोशी यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. यावेळी देवीदास कणखर, विनायक वाघ, आशा धूड, मंदा अंभोरे, रेखा खांडेभराड, उषा थुटे, समाधान कणखर, रविराज शेळके, दामोधर शर्मा, ज्ञानेश्‍वर जाधव, सुरेश दादा यांच्यासह इतरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पवन देशमुख, प्रदीप गोरे सुंदरखेड यांनी नामदेव  जाधव व डॉ. हासन देशमुख यांच्या मार्गदर्शनात शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनुने, सुभाष गिरी, ज्ञानेश्‍वर जाधव, डॉ. विनायक वाघ, प्रकाश अंभोरे, विजय गायकवाड, सादिक देशमुख, कलीम सेठ, शिवाजी सोनुने, बाबुराव पाटील, हरिदास खांडेभराड, संतोष राजपूत, तन्वीर देशमुख, नवृत्ती साळवे, अनिल मिसाळ, सुगदेव नरोटे, दासा कणखर, मुजमुळे, शेषराव पाटील, भिका सोलनकी, पका घुबे, मुरली महाराज येवले, राजू शेटे, मधुकर गहुभे, देवीदास भगत, राजू पाटील, रतिराम शेळके, बडे, भानुदास गहुभे, विजयकुमार डागा, मदन लखाने, प्रल्हाद ठाकूर, शरद सावजी, तेजराव मुंडे, मेरत, पवार, प्रद्युमन सोनटक्के, दिनकर टेकाळे, मधुकर देठे, रमेशसिंग चव्हाण, दिगंबर चिंचोले आदी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.  

फुगड्या खेळत शरद जोशी यांचा जन्मोत्सव साजरामिरवणुकीदरम्यान शेतकरी नेते नामदेव जाधव, शाहीर खांडेभराड यांनी हलगीच्या तालावर ताल धरत फुगडी खेळून मिरवणुकीला रंगत आणली. त्यानंतर संघटनेच्या शेतकरी महिलाही मागे राहिल्या नाही. हलगीच्या तालावर एकमेकांच्या हातात हात गुंफत महिलांनी फुगड्या खेळून स्व. जोशी यांचा जन्मोत्सव साजरा केला. हलगीच्या तालावर रंगलेल्या महिला-पुरुषांच्या फुगड्या लक्षवेधी ठरल्या.