शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - राजू शेट्टी

By admin | Updated: January 21, 2017 02:38 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाभर सभा.

बुलडाणा, दि. २0- विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोझा असल्याने आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सुरुवातीला त्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी वानखेड येथे पार पडलेल्या सभेत दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आहे. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांच्या सभांचे आयोजन संग्रामपूर, शेगाव व खामगाव तालुक्यात करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश चोपडे, प्रशांत डिक्कर, कैलास फाटे, श्याम अवसळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. त्यांना भरघोस मदतीची गरज आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत पैसे व दारूचा वापर करणार्‍या उमेदवारांना धडा शिकवा. भ्रष्ट पुढार्‍यांना निवडणुकीत पराभतू करा, त्यामुळे नेते भ्रष्टाचार करणार नाहीत. शेतकर्‍यांसाठी कार्य करणार्‍या वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्यास तयार असणार्‍या नेत्यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीत अमाप खर्च न करता, दारू व पैशांचे वाटप न करताही निवडणुका जिंकता येतात, हे मी निवडून येऊन सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. ना. रविकांत तुपकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले, की शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांची विशेष व्होट बँक तयार करायला हवी. शेतकरी हे शेतीच्या मुद्यावर निवडणुकीत मतदान करीत नाहीत. त्यामुळे त्यांची मते विभागल्या जातात. तसेच आगामी निवडणुकीत स्वाभिमानी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे ना. तुपकर यांनी सांगितले.