शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

दोन हजारांची लाच घेताना कृषी सहायकास अटक

By admin | Updated: March 25, 2017 02:36 IST

शेततळ्याचे माप, नोंदणीसाठी केली होती पैशांची मागणी

संग्रामपूर(बुलडाणा), दि. २४- शेततळ्याचे माप व नोंदणीसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणार्‍या संग्रामपूर येथील कृषी कार्यालयातील कृषी सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ मार्च रोजी दुपारी रंगेहात पकडले.संग्रामपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पंचासमक्ष दोन हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कृषी सहायक अशोक चिंधाजी नांदवे यांच्या विरोधात ही कारवाई केली. तामगाव येथील अनिल मुरलीधर घिवे यांचे तामगाव शेतशिवारात गट नं. १४ मध्ये ५ एकर शेत असून, त्यांनी कृषी विभागांतर्गत मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत त्यांच्या शेतामध्ये २५ बाय २0 बाय ३ चे शेततळे मंजूर झाले होते. त्यानंतर त्यांनी शेतात शेततळे खोदून ३१ डिसेंबरला शेततळ्याचे खोदकाम पूर्ण केले. त्यानंतर शेतकरी अनिल घिवे हे शेततळ्याची मापे व नोंदणीसाठी कृषी सहायक नांदवे यांच्याकडे गेले असता, कृषी सहायक अशोक चिंधाजी नांदवे हे शेतकरी अनिल घिवे यांना शेततळ्याचे मापे व नोंदणीसाठी तीन हजार रुपयांची मागणी करीत होते. दरम्यान, तडजोडीअंती शेततळ्याची मापे व नोंदणीसाठी सहायक नांदवे यानी दोन हजारांची लाच मागितली. याप्रकरणी शेतकरी घिवे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने २४ मार्च रोजी सापळा रचण्यात येऊन कृषी कार्यालयातील कृषी सहायक नांदवे याने संबंधित शेतकर्‍याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृषी सहायक नांदवे याला दुपारी रंगेहात अटक केली. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.