शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांचा आज ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:20 IST

टेंभुर्णा : शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीने दुसर्‍या टप्प्यातील आक्रमक आंदोलनाची घोषणा केली असून, या आंदोलनाचा बिगुल सोमवार, १४ ऑगस्ट रोजी खामगाव येथून फुंकला जाणार आहे. यामध्ये खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात टेंभुर्णा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराजू शेट्टी करणार नेतृत्व कर्जमाफीसाठी सुकाणू समिती आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णा : शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीने दुसर्‍या टप्प्यातील आक्रमक आंदोलनाची घोषणा केली असून, या आंदोलनाचा बिगुल सोमवार, १४ ऑगस्ट रोजी खामगाव येथून फुंकला जाणार आहे. यामध्ये खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात टेंभुर्णा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी असून, कठीण निकष व अटी लावल्याने पाच टक्के शेतकर्‍यांनासुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे सुकाणू समितीचे मत आहे. करिता शेतकर्‍यांना केवळ कर्जमाफी नको असून, संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे. शेतकर्‍यांना सरसकट विनाअट कर्जमुक्ती द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्च व ५0 टक्के नफा याप्रमाणे हमीभाव द्यावा तसेच सुकाणू समितीने सादर केलेल्या मागणीपत्रातील मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील टेंभुर्णा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर, राणा चंदन आदींचीसुद्धा उपस्थिती राहणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकारने शेतीमालाच्या भावात शेतकर्‍यांना लुटले. त्यामुळे कर्जमुक्ती हा शेतकर्‍यांचा नैतिक अधिकार आहे. तरी शेतकर्‍यांनी घरच्या भाकरी सोबत घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सुकाणू समितीचे दादा रायपुरे, कैलास फाटे, जितेंद्र चोपडे आदींनी केले आहे.