शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या सलग सुटीमुळे शेतकरी अडचणीत!

By admin | Updated: June 27, 2017 09:26 IST

कर्जमाफीच्या घोषणेमुळे मंगळवारी उसळणार गर्दी!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बँकांना सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यापासून बँका बंदच आहेत. त्यामुळे कर्र्जमाफी मिळालेले शेतकरी बँका उघडण्याची वाट पाहत असून, मंगळवारी बँकांमध्ये एकच गर्दी उसळणार आहे.बहुप्रतीक्षित ठरलेली सरसकट कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी जाहीर केली. यामध्ये शेतीची कोणतीही मर्यादा न ठेवता दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. यात जून २०१६ पर्यंतच्या थकीत कर्जाचा समावेश आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पेरणीचे दिवस आलेले असताना व अनेक शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसा नसल्याने त्यांची आधीच अडचण झालेली आहे. त्यात शनिवारी जाहीर झालेल्या कर्जमाफीमुळे अशा शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला; मात्र ज्या दिवशी कर्जमाफी जाहीर झाली तो चवथा शनिवार असल्याने बँका या दिवशी बंदच होत्या. दुसऱ्या दिवशी रविवारची साप्ताहिक सुटी व सोमवारी रमजान ईदची सुटी असल्यामुळे सलग तीन दिवस बँका बंदच राहिल्या. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्याने त्यांना नवीन कर्जाबाबत बँकेकडे विचारणा करण्यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे; मात्र बँकांची सलग सुटी आली. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली. आता मंगळवारी बँका उघडताच सर्व बँकांमध्ये गर्दी उसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा ताण चांगलाच वाढणार असून वादविवादाचे प्रसंगही उद्भवू शकतात. बँकांकडून पुन्हा टोलवाटोलवीची शक्यता!बँकांचे शेतकऱ्यांसोबत सहकार्याचे धोरण नसल्याचे नेहमीच दिसून येते. या अगोदर कर्जमाफीची घोषणा सरकारने करुन शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज पेरणीसाठी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते; परंतु शासनाने परिपत्रक काढूनही बँका याबाबत आम्हाला आदेशच प्राप्त झाले नसल्याचे अजूनही सांगत आहेत. सदर १० हजाराचे तत्काळ कर्ज वाटप अद्यापही शेतकऱ्यांना सुरु झालेले नाही. सदर कर्ज वाटप रखडलेले असताना आता नवीन आदेशही आम्हाला प्राप्त नसल्याचे सांगून बँका टोलवाटोलवी करु शकतात.