सिंदखेड राजा : तालुक्यातील खापरखुटी येथे एका शेतकऱ्याने आत्महत्याकेल्याची घटना घडली.खापरखुटी येथील संतोष दौलतराव शिंदे यांनी २७ मार्च रोजी कर्जाच्या ओझ्यामुळे विषप्राषण केले होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्टचे कर्ज आहे. तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ व उत्पन्नात झालेली घट यामुळे शिंदे चिंतेत होते. दोन मुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, याची चिंता त्यांना सतावत होती.
शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: April 1, 2017 16:52 IST