शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वीज तुटवड्याचा फटका शेतकर्‍यांना

By admin | Updated: May 13, 2017 18:45 IST

दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्यासुमारास सुरू करण्यात येत आहे.

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे वीजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. महावितरणने कृषि पंपांना देण्यात येणाऱ्या वीजेत कपात केली असून, दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे.

 दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळींब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पिकही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पिक घेतल्या जाते.उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या  वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषिपंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर विद्युत पुरवठा बंद असतो तर रात्रीच्यावेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणला महानिर्मितीसह विविध स्त्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मे.वॅ.पर्यन्त विजेची उपलब्धता कमी असतांनाही महावितरणने १५०० मे.वॅ. पर्यन्त  आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.राज्यातील काही संच तांत्रिककारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.  यासोबतच इतर स्त्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे.  त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.