शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:31 IST

लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे घेतलेले कर्ज ‘जैसे थे’ शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले!

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.परिसरातील शेतकर्‍यांवर गेल्या चार-पाच वर्षापासून आस्मानी, सुलतानी, नैसर्गिक आपत्तीने पीक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिकस्थिती खालावली आहे. त्यातच शासनाच्या वेळकाढून पणामुळे निघालेल्या कुठल्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाले आहेत. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शासनाने कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असणार्‍या शेतकर्‍याची दिवाळी मात्र अंधारातच गेली. दिवाळीनंतर महिना होत आला तरी अद्यापही रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यंदा खरीप, रब्बी हंगामी पिकांचे बि-बियाणे, खत, औषधी, पेरणी पिक काढणी व शेती मशागतीची मजुरी या सर्वांचे भाव वाढले आहे. तर दुसरीकडे शेती मालाला भाव नाही, नेहमी शेतमालाची बाजारात आवक वाढली की, शेतमालाचे भाव पडतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडते. मात्र याकडे शासनासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी कायम आर्थिक विवंचनेत असतो. परिणामत: त्याचा आर्थिकस्तर उंचावत नसल्याचे सुज्ञ नागरिक बोलून दाखवित आहेत. 

सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्याची चिंतासोयाबीनच्या नगदी पिकाच्या भरवशावर बरेच शेतकरी खाजगी सावकाराकडून कर्ज स्वरुपात पैसे घेऊन पिकांचा लागवड व मशागत खर्च भागवत असतात. मात्र यावर्षीच्या सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे बि-बियाणे व लागवड खर्चही भागत नसल्याने सावकाराचे देणे कसे द्यायचे ह्या विवंचनेत शेतकरी पडला आहे.

टॅग्स :agricultureशेती