शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केंद्रावरील लुटीविरोधात शेतकरी रस्त्यावर!

By admin | Updated: May 10, 2017 07:14 IST

संतप्त शेतक-यांनी ९ मे रोजी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन

चिखली : नाफेड खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या हमालांच्या मनमानी विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी ९ मे रोजी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे खामगाव-जालना महामार्गावरील वाहतूक सुमारे ३ ते ४ तास ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली.येथील नाफेड खरेदी केंद्रावर हमालाद्वारे शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या; मात्र त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू होती. दरम्यान, दरेगाव येथील गणेश विठोबा मान्टे या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल विक्रीसाठी आणला असता, खरेदी केंद्रावरील चाळणी क्रमांक १ व ३ वरील हमालांनी तब्बल १०० रुपये पोत्याप्रमाणे हमाली मागितली. ती देण्यास मान्टे यांनी नकार दिला. शासन निर्णयानुसार २० रुपये पोते हमाली देण्यास मान्टे तयार होते; मात्र १०० रुपये प्रती पोत्याप्रमाणे नकार दिल्यामुळे हमालांनी त्यांना डावलून दुसऱ्या शेतकऱ्याचा माल मोजायला सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. दरम्यान, येथे उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी अचानकपणे रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने खरेदी केंद्रावर तणाव वाढला होता. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार मनीष गायकवाड, ठाणेदार महेंद्र देशमुख, बाजार समितीचे सभापती सत्येंद्र भुसारी, जी.प. सदस्य शरद हाडे, स्वभिमानीचे विनायक सरनाईक, जनशक्ती संघटनेचे प्रशांत ढोरे यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान, तहसीलदार गायकवाड व बाजार समितीचे सभापती डॉ.भुसारी यांनी सत्य परिस्थिती जाणून घेतल्यानंतर जादा रक्कम आकारणाऱ्या १२ हमालांचे ११ मे पर्यंत हमाल परवाने निलंबित करण्यात आले. परवाने निलंबित केलेल्या हमालांमध्ये अशोक नाटेकर, रामेश्वर शेळके, संभाजी नाटेकर, बबलू पवार, सुनील पवार, शे.फेरोज शे.हसम, नीलेश आराख, अनिल पवार, ज्ञानेश्वर सोनुने, राजेश गोपले, मारोती साळवे, विजय बोरकर यांचा समावेश आहे.