शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा संप सुरूच!

By admin | Updated: June 4, 2017 05:21 IST

शेतक-यांनी विविध मागण्यांकरिता संप पुकारला असून, संपाच्या तिस-या दिवशीही जिल्हाभरात भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा/ खामगाव : शेतक-यांनी विविध मागण्यांकरिता संप पुकारला असून, संपाच्या तिसऱ्या दिवशीही जिल्हाभरात भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी पूर्ण करेपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला. े जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णत्वास जात नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संप सुरूच राहणार असून, यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खामगावात सर्वपक्षीयांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संप पुकारण्याची दुर्दैवी वेळ कृषिप्रधान असलेल्या देशात शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आली आहे; मात्र शेतकऱ्यांचे आंदोलन बंद पाडण्यासाठी पुन्हा अर्धवट आश्वासने शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जात आहेत; मात्र आता हीच योग्य वेळ असून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डच्या सभागृहात शनिवारी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन अहमदाबादकर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर देशमुख, भाराकाँचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.अनिल अंमलकार, शहरप्रमुख सुनील अग्रवाल, माजी शहरप्रमुख संजय अवताडे, अ.भा.किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पताळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंजाजी टिकार, विदर्भ विकास आवामी पार्टीचे डॉ.नावेद देशमुख यांच्या उपरोक्त सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ४५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांवर संपासारखी दुर्दैवी वेळ आली असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या ५ जून रोजी खामगाव बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागासोबतच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवून अधिक तीव्र करण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला.जानेफळ येथे आठवडी बाजार बंदला प्रतिसाद शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या संपाला समर्थन म्हणून येथील आठवडी बाजार ३ जून रोजी बंद ठेवण्यात आला असून, शेतकऱ्यांचा या बंदला प्रतिसाद मिळाला. कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारलेला असल्याने त्याला पाठिंबा म्हणून जानेफळ येथे सर्वपक्षीय नेत्यांकडून ३ जून रोजी दर शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार, २ जून रोजी दवंडी देऊन जानेफळ व परिसरात सूचित करण्यात आले होते. तसेच भाजीपाला अडत व्यापारी इत्यादींना मोबाइलवरून संपर्क करून शनिवारचा बाजार बंद असल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे कुठलाच भाजीपाला अडत दुकान तसेच इतर व्यापारीवर्गसुद्धा दुपारी १२ वाजेपर्यंत बाजारात आपली दुकाने घेऊन आले नाही. त्यामुळे बाजारात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता; परंतु दुपारनंतर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावल्याने ग्राहकांनी एकच गर्दी केल्यामुळे भाजीपाला व इतर घरगुती आवश्यक वस्तुंची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री झाली. जानेफळ येथे प्रथमच शनिवारचा आठवडी बाजार बंद असल्याचा हा प्रकार घडला आहे. परिसरातील जवळपास ५२ खेड्यातील जनता येथील आठवडी बाजारात येत असते; मात्र आजच्या बाजार बंदमुळे जनतेला फारच महागड्या वस्तू खरेदी करणे भाग पडले आहे. शेतकरी नेते गजानन तात्या कृपाळ, पांडुरंग चांगाडे, गणेश पाखरे, रामेश्वर लाहोटी, अशोक नवले, दिनकर पाटील, रमेश मिश्रा आदींनी या आठवडी बाजार बंदचे आवाहन केले होते. (वार्ताहर)