जवळा बु. (जि. बुलडाणा), दि. ३- येथील शेतकरी पुत्राने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. येथील शेतकरी काशिराम सावदेकर यांच्याकडे सहा एकर शेती आहे. त्या शेतीवर त्यांनी सन २0१३ मध्ये २५ हजाराचे जिल्हा बँकेकडून पीककर्ज घेतले. सतत तीन वर्ष नापिकी झाल्याने ते कर्ज परतफेड करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी फायनान्स कंपनीकडून ५0 हजाराचे कर्ज, ७0 हजाराचे दागिने गहाण ठेवून शेतात पेरणी केली. पावसाने दीड महिना दांडी मारल्याने पूर्ण सोयाबीन करपले. या चिंतेतून काशिराम सावदेकर यांचा मुलगा शेषराव काशिराम सावदेकर (वय ४२) याने विष प्राशन करून आत्महत्या केली.
शेतकरी पुत्राची आत्महत्या
By admin | Updated: October 4, 2016 01:53 IST