शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी फिरवला मका पिकावर नांगर

By admin | Updated: July 26, 2016 01:55 IST

कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात.

नागेश मोहिते / धाड (जि. बुलडाणा)गेल्या तीन-चार वर्षांंपासून सतत पडणार्‍या दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी पावसाने दिलासा दिला असला तरीही सध्या बुलडाणा तालुक्यात मका पिकावर मोठय़ा प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. सर्वत्र मका पीक हळदीसारखे पिवळे पडून त्याची वाढ खुंटल्याचे जाणवत असल्याने शेतकर्‍यांनी मका पिकात नांगर फिरविण्यास सुरुवात केली आहे.मागील वर्षी अवर्षण असल्याने आणि कपाशीसारखे नगदी पीक फेल ठरल्याने यावर्षी चारावर्गीय असणारे मका पीक लागवडीस शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे मका पीक सध्या बहुत खर्चीक पडत आहे. तालुक्यात कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालानुसार मका पिकाची लागवड ही ३ हजार ९६0 हेक्टर क्षेत्रावर आहे. तर चार्‍यासाठी मका पेरणी ही १८२ हेक्टर क्षेत्रावर केल्या गेली आहे. धाड परिसरात यावर्षी कपाशी पेरणी घटून मका लागवडीचे क्षेत्रात वाढ झाली आहे. सध्या परिसरात सर्वत्र मका पीक हे पिवळे पडले आहे. परिणामी या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकर्‍यांनी आपल्या पद्धतीत सर्व उपाय करूनदेखील मक्याची वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे सदर पीक खराब होत असल्याने या भागात काही शेतकर्‍यांनी सर्रास उभे मका पीक वखरून दुसरे पीक पेरले आहे. नैसर्गिक आपत्तीतून होरपळून निघणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी पिकांवर रोगराईमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरूड येथील शेतकरी शे. मुजीब शे. वाहेद रा. वरूड (रंगाप्पा) या शेतकर्‍याने आपल्या ४ एकर शेतात मका पिकाची लागवड केली. त्यांचे सर्व मका पीक पिवळे पडले असून साधारण एक एकर मका वाढ खुंटल्यासारखा होऊन त्यांनी विविध औषधी, खतांची फवारणी केली मात्र सुधारणा झाली नाही. परिणामी नाइलाजास्तव त्यांनी शेतातील उभी मका वखरून टाकली, असा प्रकार हा बहुतेक या भागात झाला आहे.