शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी रांगा लावून केली युरियाची खरेदी

By admin | Updated: September 13, 2014 00:13 IST

खामगाव : आणखी १0 हजार मेट्रिक टन युरियाची जिल्ह्यात गरज.

खामगाव : यावर्षी शेतकरी आस्मानी संकटाने त्रस्त झाला असतानाच ऐनवेळी पिकांना आवश्यक युरीयाची टंचाईमुळे त्रस्त झाला होता. मात्र ११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १५0 टन याप्रमाणे युरीया उपलब्ध झाल्याने त्याचे वाटप प्रतिशेतकरी २ बॅग याप्रमाणे कृषी सहाय्यकांच्या उ पस्थितीत कृषी केंद्रावर करण्यात आले. यामुळे कृषी केंद्रांसमोर शेतकर्‍यांच्या रांगा लागल्या होत्या.गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांची युरीयासाठी अडवणूक केल्या जात होती. तर जादा किंमत दिली तर सहजरित्या युरीया उपलब्ध होत होता. २८१ रुपये निर्धारित किंमत असलेल्या युरीयाच्या एका बॅगसाठी शेतकरी पाहून ४00 ते ४२५ अशी मनमानीपणे कृषी केंद्रचालकांकडून विक्री करण्यात येत होती. शेतकर्‍यांची युरीयासाठी होत असलेली ओरड पाहता जिल्ह्यात युरीयाची ११ सप्टेंबर रोजी आवक झाली व त्याचे वितरण जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जा., मलकापूर, संग्रामपूर,मोताळा, बुलडाणा, सिं.राजा, दे.राजा, लोणार, चिखली, मेहकर अशा तेराही तालुक्यात समप्रमाणात करण्यात आले. या खताचे वितरण प्रत्येक तालुक्यात कृषी सहाय्यकाच्या उपस्थितीत प्रति शेतकरी २ बॅग याप्रमाणे करण्यात आले. जिल्हा कृषी विकास अधिकारी रमेश बर्‍हाड यांनी जिल्ह्यात अजूनही १0 हजार मेट्रिक टन युरीयाची गरज असून त्याप्रमाणे मागणी करण्यात आली असल्याचे सांगीतले. लवकरच पुन्हा ५ हजार मेट्रिक टन युरीया उपलब्ध होणार आहे. त्यामुळे युरीयाची टंचाई भासणार नाही.