शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेने केली तुरीची होळी

By admin | Updated: March 15, 2017 01:13 IST

जिल्हाधिका-यांना निवेदन: आधारभूत किमतीने खरेदी करण्याची मागणी

बुलडाणा, दि. १४- यंदा तुरीचे दर आधारभूत किमतीपेक्षा खाली कोसळले आहे. परिणामी शेतकर्‍यांना त्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची तूर आधारभूत किमतीने खरेदी करण्यात यावी, शेतकर्‍यांना तत्काळ पैसे मिळण्याची सोय करण्यात यावी तसेच तत्काळ संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुरीची होळी करून शासनाचा निषेध केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना तुरीची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यातच शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्राची संख्या अतिशय कमी आहे. बारदानाअभावी अनेक ठिकाणी खरेदी बंद आहे. चुकार्‍यांपोटी शेतकर्‍यांना देण्यात आलेले चेक महिना महिना वटत नाहीत. त्यामुळे कास्तकाराला व्यापारी देईल त्या भावात तूर विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबावी, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत. तूर उत्पादक पट्टय़ात सर्व बाजार समित्यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरु करून पुरेशे वजनकाटे लावावेत, खरेदी केंद्रावर २४ तासात तुरीचे वजन करण्याची व ४८ तासात चेक वटवून शेतकर्‍यांच्या हातात पैसे देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या शेतकरी संघटनेने निवेदनात केल्या आहेत. सोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नमूद करून सरसकट कर्जमुक्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने तुरीची होळी केली, यावेळी नामदेवराव जाधव, डॉ.हासनराव देशमुख, समाधान कणखर, मो.सादिक देशमुख, सुगदेव नरोटे, तेजराव मुंढे, दिनकर टेकाळे, जगदीश जैस्वाल, शेषराव शेळके, भागवत शेळके, सोनटक्के, ज्ञानेश्‍वर शेळके, भिका सोळंकी, दिगंबर अंभोरे, उत्तम झुंबड, संतोष उबरहंडे, अर्जुन जाधव, माधव शिंदे, हरिदास खान्देभराड, दामोधर शर्मा, वैजयकुमार डागा, डॉ.बाबूराव नरोटे आदींची उपस्थिती होती.