शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना आता वन्य प्राण्यांचा त्रास

By admin | Updated: July 9, 2017 09:41 IST

खामगाव परिसरात कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : परिसरात अनेक शेतकर्‍यांच्या पेरण्या चांगल्या साधलेल्या असून, पिके सुस्थितीत आहेत. मात्र, या कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे. नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळी पाने हे प्राणी फस्त करीत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी लगेच शेत मशागतीची कामे उरकून घेत पेरणीही आटोपून घेतली. यानंतर मात्र पावसाने काही भागात हुलकावणी दिली, तर काही भागात पुनरागमन केले. त्यामुळे काही भागातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ज्या भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली त्या भागातील पेरण्या चांगल्या साधल्या आहेत. परिणामी या भागात कोवळी पिके वार्‍यावर डुलताना दिसत आहेत. परंतु या पिकांवर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळ्या पिकांची हिरवीगार पाने हरीण, माकडे फस्त करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना दिवसभर शेतात थांबून रखवाली करावी लागते. त्यामुळे शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. दिवसभर पिकाची राखण करुनही रात्रीच्यावेळी वन्य प्राणी येऊन पिकांचे नुकसान करतातच. विशेषत: रानडुकरे रात्री शेतांमध्ये घुसून मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.