शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

By admin | Updated: July 11, 2017 00:41 IST

बुलडाणा : बँकनिहाय शेतकरी व रक्कम याची यादी जाहीर करा, अशी मागणी करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हा अग्रणी बँकेसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने लढा उभारला. भाजपने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, बँकनिहाय शेतकरी व रक्कम याची यादी जाहीर करा, अशी मागणी करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हा अग्रणी बँकेसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ.डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, नगरसेवक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: टिष्ट्वट् करून राज्यातील कर्जमाफी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांचे जिल्हानिहाय आकडे दिले. मात्र, याबाबत संभ्रम असून, खरोखरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत आहे की नाही, यासाठी बँकनिहाय शेतकऱ्यांची यादी व माफ झालेली कर्जाची रक्कम जाहीर करावी, तसेच कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकनिहाय लावण्यात यावी, शासनाने १० हजार रुपये तातडीच्या मदतीचा जी.आर. नुसार शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, या मागणीसाठी ढोल वाजवून भाजपा सरकारला यासाठी जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यावेळी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास सहन करणार नाही. दुबार पेरणीचेही संकट ओढवले आहे. साडेसात लाख हेक्टर पेरणीपैकी साडेपाच लाख पेरणी झालेले क्षेत्र पावसाच्या सुटीमुळे प्रभावित झाले आहे. दोन लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पदरमोड केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज मिळावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांनी बोलताना केली. यावेळी महिला आघाडी जि.प्र. सिंधुताई खेडेकर, उपजिल्हा प्रमुख शांताराम दाणे, बाबूराव मोरे, तालुकाप्रमुख भोजराज पाटील, सुरेश वाळूकर, बळीराम मापारी, कपिल खेडेकर, संतोष डिवरे, अनिल अमलकार, किसान सेना उप जि.प्र.लखन गाडेकर, नगरपालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, सभापती उमेश कापुरे, दीपक सोनुने, पं.स.सदस्य दिलीप सिनकर, राजू पवार, राजू मुळे, गजानन मुठ्ठे, साहेबराव डोंगरे, कृष्णा भोरे उपसभापती, गजानन मामलकर, गुलाब शिराळ, अनंता पाटील, रणजित राजपूत, विश्वंभर लांजूळकर, सुखदेव शिपलकर, समाधान साबळे, संजय तोटे, राहुल जाधव, नीलेश राठोड, अरूण टेकाळे, अनिल जगताप, विजय इतवारे, जि.प.सदस्य आशिष रहाटे, माणिकराव सावळे, धनशिराम शिंपणे, सुमंत इंगळे, गजानन टेकाळे, गजानन धंदर, श्रीकांत गायकवाड, दीपक तुपकर, अनुप श्रीवास्तव, प्रवीण निमकर्डे, वैशाली ठाकरे, किरण देशपांडे, शेषराव सावळे, मोहन निमरोट, गोपाल बारवाल, नंदू कऱ्हाडे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.