शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बाजारात गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 00:05 IST

पाऊस पडताच सुरु झाली पेरणीची लगबग!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत दोन-तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे परिसरात पेरणीची लगबग सुरु झाली असून, बाजारात खत व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला होता. पावसाळा लवकर सुरु होईल, असे वाटल्याने शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे घाई-घाईत उरकून घेतली; परंतु त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारली. त्यामुळे एक-दोन पावसावर पेरणी करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अनेकांच्या पेरण्या उलटण्याची स्थिती निर्माण झाली होती, तर उर्वरित शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शेतकरी पेरणीसाठी खत व बियाणे खरेदी करीत आहेत, तर अगोदरच पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, हे शेतकरी पिकांची फवारणी व अन्य पीक मशागतीची कामे उत्साहाने करीत आहेत, तर ज्यांची पेरणी करणे अद्याप बाकी आहे, त्यांनी पेरणीची तयारी चालविली आहे, त्यामुळे शहरातील बाजारपेठेत कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळलेली दिसून येते. काही शेतकरी अनेक दुकानात भाव विचारुन मगच खरेदी करतात.कृषी केंद्रधारकांचीच चालते मर्जीअनेक शेतकरी हे त्यांच्या विश्वातील कृषी केंद्रांवरच जावून खत व बियाणे खरेदी करीत आहेत. दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे नवीन वाणाचे बियाणे व खते ते खरेदी करताना दिसतात. अनेक दुकानदार शेतकऱ्यांना आपल्या मर्जीनुसार पटवून देत काही महागडे बियाणे खरेदी करण्यास बाध्य करीत असल्याचेही दिसून येते. सोयाबीनकडे वाढला शेतकऱ्यांचा कलयावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. मागिल वर्षी तूर या पिकाने शेतकऱ्यांना उत्पादन दिले; पण उत्पन्न नाही. त्यामुळे तुरीबाबत शेतकऱ्यांमध्ये काहीशी उदासीनता निर्माण झालेली आहे, तर पऱ्हाटी लागवडीचा खर्च व मेहनत जास्त असल्याने अनेक जण सोयाबीनला पसंती देताना दिसून येतात.