शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा ओढा शेततळ्यांकडे !

By admin | Updated: June 26, 2017 10:21 IST

पाच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट; ८ हजार १४० शेतक-यांची मागणी.

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाऊस लहरी झाल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी कृषी विभागाने पाच हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, जवळपास ८ हजार १४० शेतकऱ्यांनी शेततळे मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवदान मिळावे, यासाठी शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असल्याने सरकारने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.यावर्षी जिल्ह्यात ५ हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात बुलडाणा उपविभागात १ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, बुलडाणा तालुक्यात ३००, चिखली ४००, मोताळा ४०० व मलकापूर तालुक्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. खामगाव उपविभागासाठी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, खामगाव तालुका ४००, शेगाव ५००, नांदुरा ५००, संग्रामपूर ५०० व जळगाव जामोद ५०० व मेहकर उपविभागासाठी १००० शेततळ्याचे उद्दिष्ट असून, मेहकर तालुका ३००, लोणार २०० व देऊळगावराजा २५० व सिंदखेडराजा तालुक्यासाठी २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे;मात्र शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढत असल्यामुळे शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतर्गत १३ तालुक्यातून ८ हजार १४० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.