शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST

धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे ...

धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे अजूनही शेतकऱ्यांना उमजले नाही. अशातच या वर्षी कांदा बियाणांचे भाव जास्त असल्याने लागवड खर्च वाढला. त्यात आता कांद्याचे दर घसरल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

कापूस, तेलबिया व ज्वारी हे मुख्य पीक असलेल्या अकोला जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. दरवर्षी कांदा पिकाचे होणारे नुकसान, बाजारपेठेत मिळणारा कमी दर, यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो. तरीही यंदा चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवड करतात. या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा आला, तेव्हा शासनाने निर्यातबंदी केली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघणे कठीण झाले. सोबतच या वर्षी कांदा बियाणेही महागले. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी पाचशे ते सहाशे रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांदा बियाण्याच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले. परिणामी, कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली. उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेने महागडे बियाणे खरेदी करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर कमी होत आहेत. कांद्याला सरासरी १,००० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल दर सांगितला जात आहे. याच कांद्याला मागील १५ ते २० दिवसांआधी ३,५०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

बाजारभावाच्या किमतीतील घसरणीमुळे कांदा लागवडीचा हजारो रुपयाच्या घरात असून, तो निघणेही कठीण झालेला आहे.

- गजानन पायघन, शेतकरी धामणगांव धाड