शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संकटात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे ...

धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे अजूनही शेतकऱ्यांना उमजले नाही. अशातच या वर्षी कांदा बियाणांचे भाव जास्त असल्याने लागवड खर्च वाढला. त्यात आता कांद्याचे दर घसरल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

कापूस, तेलबिया व ज्वारी हे मुख्य पीक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. दरवर्षी कांदा पिकाचे होणारे नुकसान, बाजारपेठेत मिळणारा कमी दर, यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो. तरीही यंदा चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवड करतात. या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा आला, तेव्हा शासनाने निर्यातबंदी केली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघणे कठीण झाले. सोबतच या वर्षी कांदा बियाणेही महागले. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी पाचशे ते सहाशे रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांदा बियाण्याच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले. परिणामी, कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली. उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेने महागडे बियाणे खरेदी करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर कमी होत आहेत. कांद्याला सरासरी १,००० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल दर सांगितला जात आहे. याच कांद्याला मागील १५ ते २० दिवसांआधी ३,५०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

बाजारभावाच्या किमतीतील घसरणीमुळे कांदा लागवडीचा हजारो रुपयाच्या घरात असून, तो निघणेही कठीण झालेला आहे.

- गजानन पायघन, शेतकरी धामणगांव धाड