शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोक्याच्या जागांवरील झाडे असुरक्षित !

By admin | Updated: May 17, 2017 01:30 IST

झाडाच्या बुंध्यांना आग लावून केले जाते मैदान मोकळे

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पर्यावरण रक्षणासाठी मोलाची भूमिका अदा करणारी झाडे खामगाव शहरात असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. शहरातील काही मोक्याच्या जागांसह खुल्या मैदानांतील झाडांनाही आता लक्ष्य केल्या जात असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली आहे.वाढत्या महागाईमुळे दिवसेंदिवस प्लॉटच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. अशातच शहरातील मोक्याच्या जागेच्या वापरासाठी या जागांवर असलेली झाडे जमीनदोस्त करण्याचा सपाटा काही असामाजिक तत्त्वांकडून लावल्या जात आहे. वृक्षसंवर्धन करण्याऐवजी आहेत त्याच वृक्षांना तोडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, एखाद्या हिरव्यागार वृक्षावर एकाच वेळी घाव न घालता, या झाडाच्या बुंध्याला आग लावून सदर झाडाचे खोड कमकुवत करण्यात येते. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने झाडांची कत्तल करण्यात येत असून, शहरातील वामन नगर भागातील वृक्षाला याच पद्धतीने लक्ष केल्या जात आहे. या झाडाच्या बुंध्याशेजारी परिसरातील एका विशिष्ट व्यक्तीकडून आग लावली जात आहे. दरम्यान, काही नागरिकांनी ही आग विझविल्यानंतरही संबंधितांकडून वारंवार या हिरव्यागार झाडाच्या बुंध्याला आग लावल्या जात असल्याने, शहरातील हिरवीगार झाडे सुरक्षित नसल्याचा प्रत्यय शहरवासीयांना येत आहे. वामन नगरातील एका झाडासोबतच यशोधरा नगरातील एका वडाच्या झाडालाही गेल्या काही दिवसांपूर्वीच लक्ष करण्यात आले होते. त्याचप्रमाणे खुल्या मैदानातील झाडांच्या बुंध्याला आग लावली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.जागेच्या वापरासाठी झाडांचा बळी!घराशेजारील मैदान अथवा मोक्याच्या जागेचा वापर करण्यासाठी हिरव्यागार वृक्षांचा बळी दिला जात आहे. उच्चभू्र वस्तीत प्रामुख्याने असे प्रकार घडत असले, तरी सामान्य वस्तीमधील नागरिक जळतानासाठी या झाडांचा बळी देत असल्याचे वास्तव समोर आले आहे.सामाजिक संस्थांचे दुर्लक्ष! शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात असताना सामाजिक संस्थांची चुप्पी चर्चेचा विषय बनली आहे. वृक्ष लागवडीसाठी झटणाऱ्या संस्थांकडून शहरातील झाडांची दखल घेणे अपेक्षित आहे; मात्र शासकीय कार्यालयांप्रमाणेच इतर सामाजिक संघटनाही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांचीही याकडे डोळे झाक असल्याने, वृक्षतोडीस या संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मूक संमती तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरात काही भागात वृक्षतोड केल्या जात असल्याची माहिती आपणास प्राप्त झाली आहे. शासनाकडून वृक्ष जगविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांची कोणतीही गय पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार नाही. - मनोज पवार, वृक्ष प्राधिकरण अधिकारी नगर परिषद खामगाव.नवीन झाडे लावण्याऐवजी असलेली झाडे जमीनदोस्त करण्याचा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे परिसरातील झाडांचे सुव्यवस्थित संगोपन करण्यााठी वृक्ष समित्यांचे गठन आवश्यक आहे.- संजय गुरव, वृक्षप्रेमी.