बुलडाणा : बनावट दारू तयार करून विक्री करीत असलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ एप्रिल राेजी अटक केली़ त्याच्याकडून पाच लाख २३ हजार ५४८ रुपयांचा एवज जप्त केला़
डिडाेळा शिवारात सुभाष इंगळे व अमोल चोपडे हे दोघे मिळून बनावट दारू तयार करून विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ या माहितीच्या आधारे पाेलिसांनी धाड टाकून बनावट दारू निर्मिती करण्याचे रसायन व इतर साहित्य असा पाच लाख २३ हजार ५४८ रुपयांचा ऐवज जप्त केला़ तसेच सुभाषसिंग दिवाणसिंग इंगळे याला अटक करण्यात आली आहे़ तसेच आरोपी अमोल रमेश चोपडे रा़ जळगांव जामोद हा पसार झाला आहे़ याप्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बोराखेडी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या स.पो.नि. नागेशकुमार चतरकर यांच्याकडे देण्यात आला आहे़ आराेपी सुभाषसिंग दिवाणसिंग इंगळे यास न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व बाेराखेडी पाेलिसांच्या पथकाने केली़