शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर बनावट अकाउंट; २० गुन्हे दाखल, सात दिवसांत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : साेशल मीडियाचा वापर माेठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा दुरुपयाेग करणारे गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : साेशल मीडियाचा वापर माेठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा दुरुपयाेग करणारे गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. गत काही वर्षांपासून फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट तयार करायचे आणि त्याच्या मित्रांकडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. जिल्हाभरात सन २०१९ ते २०२१च्या जूनपर्यंत २० गुन्हे दाखल झाले आहेत. काेराेनाच्या काळात अशा तक्रारी वाढल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अनेक जण समाजमाध्यमांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. सायबर गुन्हेगार फसवणुकीचे अनेक मार्ग शाेधत असतात. गत काही वर्षात फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट काढायचे, त्याच्या मित्रांना पैशांची मागणी करायची, असा नवीन प्रकार सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. असा प्रकार घडल्यास तातडीने पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. त्यावर सात दिवसात ते अकाउंट बंद करण्यात येते.

ओटीपी किंवा क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती घेऊन फसवणूक होते असल्याची जनजागृती हाेत आहे. त्यामुळे, नागरिक सावध झाल्याने सायबर गुन्हेगार फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग वापरत आहेत.

ही घ्यावी काळजी

फेसबुकवर एकापेक्षा जास्त अकाउंट काढू नये.

आपल्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड १ ते ९ अंक, ए टू झेड आणि स्पेशल कॅरेक्टर वापरून ठेवावा.

फेसबुकच्या अकाउंटच्या प्रायव्हसी सेंटीमध्ये फ्रेंडलिस्टची सेंटिग ओनली फाॅर मी करावी.

अनाेळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.

साेशल मीडियावरून पैशाची मागणी झाल्यास त्याला दाद देऊ नये.

तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर...

फेसबुकवर फेक अकाउंट शाेधा. स्वत:च्या किंवा ज्याच्याकडून समजले त्याच्याकडून त्या प्राेफाइलची लिंक मागवून घ्या.

फेक अकाउंट दिसल्यास त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डाॅटवर क्लिक करा. त्यामध्ये फाईंड सपाेर्ट आणि रिपाेर्ट प्राेफाईलवर क्लिक करा.

प्रिटेंडिंग टू बी समवन वर या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करून स्वत: रिपाेर्ट करत असाल तर मी सिलेक्ट करा, मित्रासाठी करत असाल तर फ्रेंड सिलेक्ट करा.

पुढे टाइप करण्यासाठी एक बाॅक्स येईल. त्यात मित्राचे नाव टाइप करा व मित्राचे ओरिजनल प्राेफाईल सिलेक्ट करून रिपाेर्ट सबमिट करा. त्यानंतर ते अकाउंट बंद हाेणार आहे.

नागरिकांना तक्रारीसाठी स्वतंत्र पाेर्टल

समाज माध्यमावर किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी स्वतंत्र पाेर्टल तयार करण्यात आले आहेत.

सर्वात आधी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागते. ही तक्रार संबंधित पाेलीस ठाण्याचे अंमलदार किंवा तपास अधिकारी ते सायबर सेलकडे पाठवते.

तांत्रिक बाबींचा तपास सायबर सेलकडून करण्यात येताे. सायबर सेलकडून तपास करून आराेपींचा शाेध लावण्यात येताे.

शेगाव येथील एका महिलेची फेसबुकवरून बदनामी करणाऱ्यास एका आराेपीस सायबर सेलने नुकतीच अटक केली हाेती.

बनावट अकाउंट काढल्याचे आढळल्यास तातडीने पाेलीस स्टेशनला तक्रार करावी.

सायबर सेलकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसांनी बनावट अकाउंट बंद हाेते.

तक्रारी वाढल्या

काेराेना काळात फेसबुक अकाउंट हॅक करून किंवा बनावट खाते उघडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे, नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

फेसबुकवर सुंदर मुलींच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सेक्स्टाॅर्शनचे प्रकारही वाढले आहेत.

त्यामुळे, समाज माध्यमांचा वापर करताना नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे.