शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिके वाचविण्यासाठी कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:10 IST

लिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा परिणाम सोयाबीन, कपाशीला फटका!

लोकमत न्यूज नेटवर्कलिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.मोताळा तालुक्यातील लिहा बु. विभागात प्रथमपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते; मात्र परतीच्या पावसाने सुरुवातीला कमी वेळात दोन दिवस झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. या पावसामुळे विभागातील नदी, नाल्यावरील बंधार्‍यामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात कपाशी, तूर व रब्बी पिकांना एक-दोन पाणी देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो; मात्र संततधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडली असून, सोयाबीन व कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे.या आठवड्यात प्रथमपासूनच आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरीचे दर वधारले आहेत. हवामान खात्याच्या इशार्‍यामुळे गावातील काही शेतकर्‍यांनी मुनादी देऊन प्रचलित दरापेक्षा प्रति किलो कापूस वेचणीत वाढ करून स्वत:च्या शेतातील कापूस पावसाअगोदरच गोळा केला; परंतु कित्येक शेतकरी मजुरी वाढविण्यासाठी तयार नसल्यामुळे शेतमजूरसुद्धा जिकडे मजुरी वाढ मिळेल, त्यांच्या शेतात जाण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळे मजुराप्रती शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण होताना दिसत होता.  त्यामुळे संततधार पावसाने काही शेतकर्‍यांना फटका दिला. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन शेतात सोंगणीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी काही शेतकर्‍यांच्या सोयाबीनला अंकुर फुटण्याची शक्यता आहे.ज्या शेतकर्‍यांनी मजुरी कमी होईल व दर वाढविण्यास अनुकूलता दाखविली नाही, त्यांना सदर पावसामुळे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसणार आहे. या पावसामुळे शेतात कापणीसाठी आलेले सोयाबीन, ज्वारी काळी होण्याची शक्यता असून मका, ज्वारीचा चारा काळा झाला आहे, तर सतत पाऊस असल्यामुळे साेंगणीसाठी त्रास होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीच्या कामात कोणतीही दिरंगाई यापुढे शेतकरी वर्गासाठी नुकसानीत भर टाकणारी ठरणार आहे. त्यामुळे मजुरीत वाढ करण्याबाबत शेतकर्‍यांनी आपले धोरण बदलून लवचिक करावे व पिकाची अवस्था व निसर्गाचा लहरीपणा यामध्ये समन्वय साधून मजुरी दरात वाढ देणे आवश्यक झाले आहे.  आपल्या मालास चांगला बाजार भाव मिळण्यासाठी त्याची प्रत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना वाढीव मजुरी देत असल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे.