शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST

व्यायामामुळे किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीरात आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी ...

व्यायामामुळे किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीरात आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी मिळणे आवश्यक आहे. आपण दररोज किती पाणी प्यावे याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आरोग्यतज्ज्ञ सामान्यत: दोन लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात. काही तज्ज्ञांच्या मते तहान लागलेली नसतानाही दिवसभर सतत पाणी पिणे आवश्यक आहे. तर काहींच्या मते तहान लागलेली नसेल तर विनाकारण पाणी पिऊ नये.

कोणी किती प्यावे पाणी?

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)

नवजात ५ ते ६ कप

१२ वर्षांपर्यंत २.५

१६ ते २९ वर्षांपर्यंत २.५

३१ ते ४० वर्षांपर्यंत ३

४१ ते ६० वर्षांपर्यंत ३

६१ पेक्षा जास्त २

शरीरात पाणी जास्त झाले तर...

वैद्यक शास्त्रानुसार प्रत्येकाला भरपूर पाणी पिण्याची गरज नाही. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. दररोज किमान ५ ते ६ लिटर पाणी प्यावे हे सांगणे चुकीचे आहे. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

तज्ज्ञ काय म्हणतात...

शरीराला ८० टक्के पाणी पिण्यामधून मिळते, तर २० टक्के अन्नापासून. दिवसभरात जवळपास अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील घाण लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे दिवसभर माणूस तरतरीत व आनंदीत राहतो. म्हणूनच योग्य तेवढे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नये.

-डॉ. अमजद सलीम, जनरल फिजिशियन

सुदृढ आरोग्यासाठी सकस आहाराबरोबर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र एका मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणेही योग्य नाही. शरीराला गरजेपुरतेच पाणी प्यावे.

-डॉ. प्रवीणकुमार निकस, वैद्यकीय अधिकारी