शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांविरुद्ध चौकशीसाठी समिती स्थापन

By admin | Updated: July 10, 2017 01:09 IST

टोकन वाटप गैरप्रकार व सेस कमी केल्याचे प्रकरण : जिल्हा उपनिबंधकांचा आदेश

शेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि इतर नऊ संचालकांनी शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या तूर खरेदीमधील टोकन वाटपांमध्ये केलेल्या गैरप्रकार आणि बाजार समितीत येणाऱ्या कापसावरील सेस कमी केल्याच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ चे कलम ४० (ब) अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचा आदेश पारित केला आहे. यासाठी द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोकन वाटपामधील भ्रष्टाचार आणि कापसावरील सेस कमी केल्याच्या प्रकरणामध्ये चिंचोली येथील शिवशंकर शालीग्राम गीते यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये सभापती गोविंद मिरगे व इतर नऊ संचालकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. ह्या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ३ जुलै रोजी आदेश करीत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये एस.पी. पोहरे सहायक निबंधक सहकारी संस्था, शेगाव आणि व्ही. डी. अभंग तालुका लेखा परीक्षक, सहकारी संस्था, शेगाव या द्वि सदस्यीय समितीची नियुक्ती केली असून, या समितीला १५ दिवसांच्या आत सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. चौकशी समितीसमोर दोन मुद्यांवर चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून, यामध्ये सर्वसाधारण सभा ४ मार्च १७ मधील विषय क्र. १७ मधील बाजार समितीचे कापसावरील सेस हा १.५ रुपये दरावरून ५० पैसे इतका कमी करून बाजार समितीचे २० लाख रुपयांचे नुकसान करणे आणि तूर खरेदी केंद्रावर बाजार समितीचे संचालक मंडळाने व्यापाऱ्यांशी संगनमत करून व आर्थिक गैरव्यवहार करून व्यापाऱ्यांनी त्यांचा माल शासकीय तूर खरेदी केंद्रावर विकला. टोकन देताना व्यापाऱ्यांनी तो जवळच्या नातेवाईकांना सत्ताधारी असल्याचा गैरफायदा घेऊन समितीचे कर्मचारी यांच्यावर अनुचित पद्धतीने दबाव निर्माण करून, संचालकांनी अधिकारांचा गैरवापर करून, नियमबाह्यपणे टोकन वाटप करण्यास भाग पाडणे, या मुद्यांचा समावेश आहे. चौकशीमधून दोघांना वगळले!बाजार समितीचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील व नीलेश प्रेमकुमार राठी या दोन संचालकांविरुद्ध सहायक निबंधक सहकारी संस्था, शेगाव यांनी चौकशी पूर्ण करून त्यांचेविरुद्ध स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला आहे. त्यामुळे हे दोन संचालक वगळून चौकशी करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.