शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएस पेन्शनधारकांचा मोर्चा

By admin | Updated: June 29, 2017 00:24 IST

शासनदरबारी मागण्या मांडण्यासाठी ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेकडून २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्र सरकारने कोशीयारी कमेटी शिफारशी त्वरीत लागू कराव्यात तसेच ३१ मे २०१७ चे पेशनर्स विरोधी परिपत्रक त्वरीत मागे द्यावे, यासह अन्य मागण्या शासनदरबारी मांडण्यासाठी ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेकडून २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक जिजामाता स्टेडीअम येथून सकाळी ११ वाजता मोर्चा निघाला, त्यानंतर संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने ईपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन देणेबाबत निर्णय पारीत केलेला आहे. सदर निर्णयाला कार्यान्वित करण्याकरीता श्रम मंत्रालयाने मंजुरात दिली. त्या आदेशाची अंमलबजावणी करत ईपीएफओने २३ मार्च २०१७ रोजी पत्र प्रसारित केले. त्यामुळे पेन्शनरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अचानक ईपीएफओ नवी दिल्ली यांनी ३१ मे २०१७ रोजी पुन्हा परिपत्रक काढून ९० टक्के पेन्शनधारकांना यातून वगळण्याची योजना बनविली. याप्रमाणे ईपीएफओने सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना केली आहे, असा आरोप ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी केला आहे. या मोर्चात विरेंद्रसिंग, बी.बी. चौधरी, एन.एस. काझी, एस.एन.बैरावार, एम.एल. काळे, ए.एन.सुरुशे, विलास पाटील, श्रीराम शेळके, बी.एन राजपूत, जे.जे. मछले, महमंद अकील, एस.एस.पवार, एम.एन.इंगळे यांच्यासह जिल्हाभरातील निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्यात सहभागी झाले होते.