शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:21 IST

नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविण्यात आल्याने, ही अतिक्रमित जागा आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील शहर पोलिस स्टेशन समोरील अतिक्रमण नगर पालिका प्रशासनाच्यावतीने हटविण्यात आले. नियोजित इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटविण्यात आल्याने, ही अतिक्रमित जागा आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते. दरम्यान, या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आल्याने, याठीकाणी स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची उभारणी करून जागेचे सौदर्यीकरण करण्याची मागणी इंदिरा गांधी स्मारक समितीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.खामगाव शहरातील अतिक्रमणामुळे अनेक मुख्य रस्त्यांचा श्वास कोंडल्या जात आहे. अतिक्रमित जागेच्या वादातून घाटपुरी रोडवर काही दिवसांपूर्वीच दुहेरी हत्यांकाडही घडले. या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील अतिक्रमण निमुर्लनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शहराच्या विविध मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. शहरातील महात्मा गांधी उद्यानानजीक नझुल शीट नं.३३ ए प्लॉट नं.२/३ मधील ५४४० चौरस फूट जागेवर स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी २० फेब्रुवारी १९८५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस नगरसेवक तथा नगर परिषद उपाध्यक्ष अशोक ढगे यांनी स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता.यासाठी तत्कालीन खासदार स्व. मधुसुदन वैराळे यांच्याकडे पुतळ्यासाठी जागा मिळण्याासठी अर्जही सादर केला होता. दरम्यान, अतिक्रमणाच्या विळख्यामुळे स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा बसविण्याचे काम थंडबस्त्यात पडले. आता या ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आल्याने, पुतळा उभारणी आणि जागेच्या सौदर्यीकरणासाठी पुढाकार घेण्याची मागणी इंदिरा गांधी स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली आहे. जागा संरक्षीत करणार!शहरातील नझुल शीट नं.३३ ए प्लॉट नं. २/३ मधील पोलिस स्टेशन समोरील म्हणजेच स्व. इंदिरा गांधी यांच्या नियोजीत स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर या जागेला पालिका प्रशासनाच्यावतीने तारेचे कुंपण करण्यात येणार असल्याचे समजते. कुंपण आणि जागा संरक्षीत करण्याच्या दृष्टीकोनातून शुक्रवारी पालिका प्रशासनाच्यावतीने जागेची पाहणी करण्यात आली.

अतिक्रमित व्यावसायिक मुख्याधिकाऱ्यांना भेटले!अतिक्रमण हटविण्यात आल्याने रोजगार बुडाल्याची ओरड करीत, शहर पोलिस स्टेशन समोरील काही अतिक्रमकांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची भेट घेतली. यावेळी सायंकाळच्या वेळेत हातगाड्यांवर व्यवसाय करू देण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्यांना कोणतेही सकारात्मक आश्वासन न मिळाल्याने अतिक्रमकांचा हिरमोड झाला.

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर नगर पालिका प्रशासनाने स्व. इंदिरा गांधी यांच्या नियोजीत पुतळ्या जवळील अतिक्रमण हटविले आहे. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा उभारणीसोबतच जागेच्या सौदर्यीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.-अशोक ढगेमाजी नगरसेवक तथा अध्यक्षइंदिरा गांधी स्मारक समिती, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावEnchroachmentअतिक्रमण