शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चिखली रस्त्यावरील अतिक्रमण काढले!

By admin | Updated: December 4, 2015 02:40 IST

बुलडाणा नगरपालिका प्रशासनाची कारवाई; शहरातील अंतर्गत अतिक्रमणाचा प्रश्न मात्र कायम.

बुलडाणा: मलकापूर सोलापूर मार्गावरील देवीचे मंदिर ते चिखली नाक्यापर्यंंत असलेले अतिक्रमण नगर पालिका प्रशासनाने अखेर हटविले. मागील पंधरा दिवसांपूर्वी धाड नाक्यावर असलेली अवैध मटन मार्केटवर पालिका प्रशासनाने बुलडोझर चालविल्यानंतर चिखली मार्गावरील मटन मार्केट आणि इतर दुकाने आज हटविण्यात आली. या संदर्भात अँड. अभय चव्हाण यांनी नागपूर हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने बुलडाणा नगर पालिकेला नोटीस बजावली होती. त्यावर नगर पालिकेने तातडीने अंमलबजावणी केली. बुलडाणा शहरात कोणत्याही मार्गावरून शहरात प्रवास केला की रस्त्यावर सर्वत्र अतिक्रमण दिसून येते. या अतिक्रमाणामुळे वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिसवस वाढत चालल्या असून, वाहनचालकांना वाहने चालविणे मुष्कील होत आहे. शहरातील महत्त्वाच्या रहदारीचे चौक व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे ही मागणी वारंवार समोर येते.; मात्र राजकीय हस्तक्षेप व अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील अतिक्रमण कमी होण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी धाड नाक्यावर अवैधरीत्या सुरू असलेले कत्तलखाने हटविण्यास नगरपालिकेने पाऊल उचलले होते. आता बुलडाणा शहरातून जाणार्‍या मलकापूर सोलापूर या महामार्गावरील अत्यंत रहदारीच्या देवीचे मंदिर ते चिखली नाका या भागातील अवैधरीत्या सुरू असलेले मटन मार्केट आणि इतर व्यावसायिकांची दुकाने हटविण्याची कारवाई नगरपालिकेने सुरू केली. यामध्ये जवळपास शंभर दुकानाचा समावेश होता. यामध्ये अवैध मटन विक्रीची दुकाने होती.