मेहकर (जि. बुलडाणा ) : येथील संताजी कॉन्व्हेंटसमोर नगरपालिकेच्या ग्रीन झोनवर नागरिकांनी अतिक्रमण केले होते. केलेले अतिक्रमण २६ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. येथील संताजी कॉन्व्हेंटसमोर नगरपालिकेची ग्रीन झोनसाठी राखीव जागा आहे. या जागेवर काही लोकांनी कच्चे-पक्के अतिक्रमण करुन घरे बांधली होती, तर काही लोकांनी चुना टाकून आखणी करुन डब्बर टाकून अतिक्रमण केले होते. सदर बाब नगरपालिका व महसूल विभाग अधिकार्यांच्या लक्षात आल्याने नगरपालिका व महसूल विभागाचे कर्मचारी २४ फेब्रुवारी रोजी याठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते; परंतु सदर अतिक्रमण काढण्यास अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शविला होता. त्यावेळी पोलीस कर्मचारीही वेळेवर आले नव्हते, त्यामुळे संबंधित कर्मचारी अतिक्रमण न काढता परतले.
ग्रीन झोनवरील अतिक्रमण काढले
By admin | Updated: February 27, 2015 01:30 IST