लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील फरशी भागातील करण्यात आलेले नालीवरील अतिक्रमण शनिवारी पालिका प्रशासनाकडून तोडण्यात आले. फरशी भागात नालीवर स्लॅब टाकून पक्के अतिक्रमण करण्यात आले होते. दरम्यान, याबाबत मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशावरून आज नगरपालिका प्रशासनाने हे अतिक्रमण तोडून काढले. यावेळी बांधकाम विभागाचे शुभम कुळकर्णी, सहायक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहिर, सुभाष शेळके, सुनील सोनोने, संजय तंबोले यांनी ही कारवाई केली. या अतिक्रमित बांधकामामुळे नाली स्वच्छतेस अडसर निर्माण होत होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ ही कारवाई केली. येत्या काही दिवसात शहरातील अनधिकृत बांधकामासोबतच उर्वरित अतिक्रमणही काढण्यात येईल.
फरशी भागातील अतिक्रमण पाडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 09:02 IST